अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीची हत्या

मूळची उत्तर प्रदेशची रहिवाशी असलेली रिमा हिचा सहा महिन्यांपूर्वीच मनोजसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर ते दोघेही साकिनाका येथे राहत होते. मात्र त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन सतत खटके उडत होते.

Shiv Sena mayor was stabbed to death with a sharp weapon In Amravati

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन रिमा भोला यादव या महिलेची तिच्या पतीने चाकूने वार करुन हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच अवघ्या पाच तासांत आरोपी पती मनोज प्रजापती याला साकिनाका पोलिसांनी अटक केली. त्याला बुधवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.

मूळची उत्तर प्रदेशची रहिवाशी असलेली रिमा हिचा सहा महिन्यांपूर्वीच मनोजसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर ते दोघेही साकिनाका येथे राहत होते. मात्र त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन सतत खटके उडत होते. याच कारणावरुन सोमवारी तिचे सासूसोबत भांडण झाले होते. यावेळी तिने तिच्या सासूला शिवीगाळ केली होती. ही माहिती मनोजला समजताच तो प्रचंड संतापला होता. त्यातच त्याला शेजारी राहणार्‍या एका तरुणासोबत तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. हा तरुण तिला नास्ता आणि जेवण आणून देत होता. त्यावरुन या दोघांमध्ये काहीतरी सुरु असल्याचे त्याला वाटत होते.

सासूसोबत झालेले भांडण आणि अनैतिक संबंधाच्या संशयावरुन त्यांच्यात पुन्हा कडाक्याचे भांडण झाले होते. रागाच्या भरात त्याने तिच्या तोंडात रुमाल कोंबून तिक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार केले होते. त्यानंतर तो पळून गेला होता. हा तरुण तिला नास्ता देण्यासाठी आला असता त्याला हा प्रकार दिसून आला.  त्याने ही माहिती साकिनाका पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी रिमाला पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पोलीस निरीक्षक दिनकर राऊत, पोलीस उपनिरीक्षक उमेशदगडे, मोमीन सोनावणे, शेख, कदम यांनी तपासाला सुरुवात करुन मनोज प्रजापतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली. सुरुवातीला त्याने आपण ही हत्या केली नसल्याचे सांगून रिमाची हत्या तिच्या मित्राने केल्याचे सांगितले. मात्र त्याच्यात नखात रक्ताचे डाग दिसले आणि पोलिसांनी या हत्येचा पर्दाफाश केला.