घरCORONA UPDATEकोरोना रुग्णांवर म्युझिक थेरपी; राजावाडी हॉस्पिटलमध्ये अनोखे उपचार

कोरोना रुग्णांवर म्युझिक थेरपी; राजावाडी हॉस्पिटलमध्ये अनोखे उपचार

Subscribe

आयसोलेशन सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या मनात समाजापासून वेगळे ठेवल्याची भावना वाढीस लागू नये, त्यांना एकटे वाटू नये, त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी राजावाडी हॉस्पिटल प्रशासनाकडून रुग्णांना म्युझिक थेरपीसह विविध थेरपीचा वापर करत आहे. रुग्णांना योग शिकवण्याबरोबरच म्युझिक थेरपीच्या माध्यमामतून त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. म्युझिक थेरपीला रुग्ण चांगला प्रतिसाद देत त्याचा आनंदही घेतला. म्युझिक थेरपीमुळे झालेल्या मनोरंजनामुळे त्यांना दिलासा मिळाल्याने हा प्रयोग राबण्याबाबत प्रशासन विचार करत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीला अन्य कोणाच्या संपर्कात येऊ नये यासाठी काही दिवस आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात येते. मात्र येथे असलेल्या रुग्णांना बाहेरील कोणत्याही व्यक्तीला भेटू दिले जात नाही. तसेच कोरोना झाल्यामुळे हे रुग्ण प्रचंड मानसिक तणावाखाली असतात. केंद्रामध्ये कोणतेच मनोरंजनाचे साधन नसल्याने रुग्णांमध्ये अधिकच नैराश्याची भावना वाढीस लागते. त्यांच्या डोक्यामध्ये विविध विचार येऊ लागतात. मानसिकदृष्ट्या ते खचण्याची शक्यता असते. परंतु रुग्ण मानसिकदृष्ट्या खचला तर तो आजाराचा सामना कसा करणार ही बाब लक्षात घेऊन राजावाडी हॉस्पिटल प्रशासन आणि व्हिजन स्मार्ट इंडिया स्वयंसेवी संस्थेने एकत्र येऊन रुग्णांचे मनोरंजन करण्यासाठी म्युझिक थेरपीचा वापर केला आहे.

- Advertisement -

आयसोलेशन वार्डच्या बाहेरून व्हिजन स्मार्ट इंडियाच्या स्वयंसेवकांनी माईकचा माध्यमातून रुग्णांना विविध प्रकारची गाणी ऐकवली. केंद्रामध्ये असलेल्या स्पीकरवरून ही गाणी ऐकताना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव उमटले होते. इतकेच नव्हे तर रुग्णांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसादही दिला. या कार्यक्रमादरम्यान अनेक रुग्ण हे चिंतामुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. राजावाडी हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर आणि संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हा उपक्रम कायम ठेवण्यात येणार असल्याची राजावाडी हॉस्पिटलच्या अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. रुग्णांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी हॉस्पिटलमधील मानसोपचार तज्ज्ञांकडून रुग्णांशी स्पीकरच्या माध्यमातून किंवा फोनच्या माध्यामातून दररोज संवाद साधण्यात येतो. जेणेकरून त्यांच्या मानामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ नये याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

राजावाडी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना म्युझिक थेरपी | Music Therapy on Covid 19 patients

राजावाडी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांना म्युझिक थेरपी | Music Therapy on Covid 19 patients

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಮೇ 4, 2020

- Advertisement -

 

रुग्ण घाबरल्यास आजार बलावण्यास अधिक मदत होते. त्यामुळे रुग्णांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी आम्ही त्यांचे समुपदेशन करण्याचे ठरवले. समुपदेशन हे फक्त त्यांच्याशी चर्चेने नव्हे तर अन्य प्रकारे करण्याचे ठरवले. त्यात आम्ही म्युझिक थेरपीचा वापर केला असता रुग्णांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी ‘हम होंगे कामयाब’ हे गाणे गात त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आम्ही त्यांच्या संपर्कांत न येताच त्यांना माइकवरूनच सर्व गोष्टी समजावून सांगत असल्याने योग्य अंतर राखतो, अशी माहिती व्हिजन स्मार्ट इंडियाचे कॅप्टन स्वामिनाथन यांनी सांगितले.

 

बऱ्याचदा रुग्णाच्या मनामध्ये सकारात्मकता असेल तर रुग्ण बरा होण्यास मदत होते. कोरोनावर औषध नसल्याने आम्ही सर्व दृष्टीने त्यावर प्रयत्न करत आहोत. तसेच व्यक्ती जर मानसिकदृष्ट्या कणखर असेल तर तो आजाराचा सामना करू शकतो.
– डॉ. विद्या ठाकूर, अधीक्षक, राजावाडी हॉस्पिटल

 

रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी काही तरी प्रयत्न करावेत यासाठी हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ज्ञ, व्हिजन स्मार्ट इंडिया आणि डॉक्टर एकत्र येऊन विचार करत असताना ही संकल्पना सुचली. प्रथम योगच्या माध्यमातून नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून आम्ही म्युझिक थेरपीचा निर्णय घेतला. त्यावेळी संस्थेच्या स्वयंसेवकांसोबत परिचारिका आणि डॉक्टरही गायल्याने रुग्णामध्ये आशादायी चित्र निर्माण झाले. – डॉ. दीपक बैद,अध्यक्ष, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टन्ट

 

पेंटिंग थेरपीचा करणार वापर

रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी विविध थेरपीचा वापर करण्यात येत आहे. म्युझिक थेरपीबरोबरच पपेंटिंग थेरपीचा वापरही करण्यात येणार आहे. अनेकदा नैराश्य हे चित्रकलेच्या माध्यमातून बाहेर पडते. त्यामुळे आम्ही ती थेरपी सुद्धा वापरणार आहोत. त्यानंतर योग्य अंतर राखत खेळता येणाऱ्या हौझी खेळाचाही वापर करण्यात येणार आहे. हौझी खेळताना जिकणाऱ्या रुग्णांना बक्षिसे दिली जाणार आहेत. आमची टीम आणि डॉक्टरांच्या सहाकार्याने आम्ही हे करत आहोत. आमचे स्वयंसेवकही न घाबरता पुढाकार घेत आहेत. त्याचबरोबर फर्माईश गाण्यांचाही कार्यक्रम करण्यात येणार आहे, अशी माहिती कॅप्टन स्वामिनाथन यांनी दिली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -