CoronaVirus LockDown: माणुसकीचं दर्शन, मुस्लिम बांधवांनी हिंदू ‘अंकल’ला दिला खांदा!

lockdown
प्रातिनिधीक फोटो

सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला. या परिस्थितीत नेहमीचं माणूस जात-धर्म विसरून एकमेकांच्या मदतीस धावून येतो. अशाच प्रकारच्या माणुसकीचं दर्शनवांद्र्यामध्ये झालं. लॉकडाऊन दरम्यान वांद्र येथे राहणाऱ्या मूळचे राज्यस्थानचे असलेल्या ६८ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. लोक त्यांना अंकल जी म्हणून बोलवत असे. ज्या दिवशी त्याचे निधन झाले त्यादिवस लॉकडाऊन असल्यामुळे त्याचे राज्यस्थानचे नातेवाईक येऊ शकले नाही. याशिवाय नालासोपार येथे राहणारे त्यांची दोन मुले देखील यादरम्यान येऊ शकले नाहीत.

अशा परिस्थितीत अंकलजीच्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम समुदायातील लोकांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे समाजात अजूनही माणुसकी असल्याचे दिसून आले. तसंच यामुळे हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचा संदेश देखील मिळाला. अंत्यसंस्कारास हजर असणारा युसूफ सिद्दीकी शेखने सांगितलं की, खूप वर्षापासून आमच्या शेजारी राज्यस्थानाचे मूळचे असणारे प्रेमचंद्र बुद्धलाल महावीर राहत होते. त्यांना आम्ही चांगलेच ओळखत होतो. लोक त्यांना अंकलजी म्हणून बोलवत असतं.

लॉकडाऊन दरम्यान त्याच्या मृत्यू झाला. परंतु त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला होत. अशा परिस्थितीत त्याच्या एक नातेवाईक समोर आला, त्याने त्यांना अग्नी दिली. तसंच आम्ही देखील धार्मिक बंधन तोडून अंतीम संस्कार केले. तसंच आमच्या समुदायातील इतर लोकांना एकत्र येऊन त्यांना खांदा दिला. तसंच यावेळी आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. पूर्ण रस्ताने राम नाम सत्य है म्हणत आम्ही त्यांना वांद्रा स्मभूमीत नेले आणि पंचतत्वात विलीन केले.

राज्यस्थानमधील गरीब कुटुंबात जन्माला आलेले प्रेमचंद्र महावीर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना अग्नी देणारा म्हणाला की, त्यांचा निधनाबाबत त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे ते वांद्र्यात येऊ शकले नाही. त्यामुळे शेजारच्या मुस्लिम समुदायातील लोकांनी त्यांच्या अंतीम संस्कार करण्यास मदत केली.


हेही वाचा – CoronaVirus: सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी झाडावर बांधलं घर!