घरमुंबईमुस्लिम, पाळीव प्राणी असणारे भाडेकरू नकोतच

मुस्लिम, पाळीव प्राणी असणारे भाडेकरू नकोतच

Subscribe

एखाद्या शहरात भाड्याने घर घेताना घर मालकाच्या अपेक्षा या भाडेकरूला नाहक त्रासच असतो. अशाच एका खोडसाळ घर मालकाने आपल्या ३ बीएचके फ्लॕट भाड्याने देताना सामाजिक तेढ निर्माण होईल अशाच स्वरूपाची जाहिरात दिली. पण या जाहिरातीने फेसबुकवर नेटकरांनी चांगलीच टिकेची झोड उठविली.Muslim and petsकाय होती पोस्ट?

एका फेसबुक वापरकर्त्याने ३ बीएचके फ्लॕट भाड्याने देताना मुस्लिम आणि पाळीव प्राणी यांना प्रवेश नाही अशी जाहिरात दिली आहे. घर घेणार्‍या भाडेकरूने मुस्लिम नसावे किंवा त्याने पाळीव प्राणी पाळलेले नसावेत अशी जाहिरात दिली आहे. एका पत्रकाराने नेटकरांच्या निदर्शनास ही जाहिरात आणून देत या पोस्टचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुंबईतील एका पॉश भागातील घरासाठी ही जाहिरात देण्यात आली आहे. आपण २० व्या शतकात आहोत, पण वांद्रे येथील रहिवाशाने दिलेली जाहिरात हा एक अजब प्रकार आहे. आपण धार्मिकतेचा प्रचार करणारा देश नाही. नेटकरांनी सांगावे ही जाहिरात योग्य आहे का? असा सवालही त्या पत्रकाराने केला आहे.
या पत्रकाराला घर घेताना आलेला अनुभव त्यांनी या फेसबुक पोस्टच्या निमित्ताने व्यक्त केला आहे. गेल्या तीन महिन्यात माझ्या नावामुळे मला घर मिळताना अनेक अडचणी आल्या. राणा नाव सांगताना मला आडनावही विचारले जायचे. पण आडनाव शेख सांगितल्यावर मला अनेक कारणाने घर देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -