घरमुंबईमविआची सभा होणारच; 'या' 15 अटींवर पोलिसांनी दिली परवानगी

मविआची सभा होणारच; ‘या’ 15 अटींवर पोलिसांनी दिली परवानगी

Subscribe

पोलिसांनी या सभेसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मविआची सभा होणारच, परंतु सभेसाठी 15 अटी घालण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या 2 एप्रिलला महाविकास आघाडीची सभा होणार आहे. मात्र, रामनवमीच्या दिवशी संभाजीनगरमध्ये दोन गटांत झालेल्या राड्यामुळे संभाजीनगरात तणावपूर्ण शांतता आहे. त्यामुळे मविआची सभा होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत असतानाच पोलिसांनी या सभेसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता मविआची सभा होणारच, परंतु सभेसाठी 15 अटी घालण्यात आल्या आहेत.

पहिल्यांदाच महाविकास आघाडीची संभाजीनगरमध्ये सभा घेतली जाणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविआ सभा घेत आहे. त्यामुळे या सभेला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. संभाजीनगरमध्ये विराट सभा होणार, असे वक्तव्य काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. पोलिसांनी या सभेसाठी घालून दिलेल्या त्या 15 अटी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

- Advertisement -

सभेसाठी घातलेल्या अटी

  • सभा संध्याकाळी 5 ते रात्री 9:45 या वेळेतच घ्या. सभेचे ठिकाण आणि वेळेत बदल करु नका
  • सभेसाठी येणाऱ्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करु नये.
  • सभेला येताना शस्त्र, तलवारी स्वत: जवळ बाळगू नये, शस्त्रांचे प्रदर्शन करु नये
  • सभा स्थळावर कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये, जास्त गर्दी जमवू नये
  • सभास्थळी ढकलाढकली, गोंधळ, चेंगाराचेंगरी निर्माण झाल्यास, आयोजक जबाबदार राहतील.
  • सभेमुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. रस्ता बंद होऊ नये
  • सभेसाठी आलेली सर्व वाहने पोलिसांनी दिलेल्या मार्गानेट प्रवास करण्याच्या सूनचा द्याव्यात
  • सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकर किंवा कार रॅली काढू नये.
  • सभेसाठीच्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाबाबत न्यायालयाच्या निर्देशांच्या मर्यादांचे पालन करावे
  • स्टेज उभारण्यासाठी आधी संबंधित ठेकेदाराने स्टॅबिलीटी प्रमाणपत्रे पोलिसांसकडे सादर करावीत.

सभेसाठी यांची उपस्थिती 

छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या सभेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -