घरमुंबईमाझेही मत ...

माझेही मत …

Subscribe

५ वर्षांच्या कालावधीचा मागोवा घेणे गरजेचे

मागील लोकसभा निवडणुकीत विकासाच्या नावावर निवडून आलेल्या सत्ताधार्‍यांनी आपल्या जाहीरनाम्यातील अनेक आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. परिणामी बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न जैसे थेच असून ५ वर्षांच्या कालावधीत सत्ताधार्‍यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या हक्काची गळचेपी केल्याच्या घटना घडल्या. जेएनयू प्रकरणी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे खोटे आरोप याच सरकारच्या कालावधीत लगावण्यात आले. निश्चलनीकरण, विकास आदी महत्त्वपूर्ण बाबींबाबत अद्याप सरकारने खरी आकडेवारी समोर आणलेली नाही. तेव्हा विकासाच्या नावावर निवडून आलेल्या सरकारच्या ५ वर्षांच्या कालावधीचा मागोवा घेत मतदारांनी मतदान करावे, असे मला वाटते. – संजय पाटील, संशोधक मुंबई विद्यापीठ

- Advertisement -

कडक कायद्यांची गरज

मागील दोन तीन वर्षांत गोमांस खाण्यावरून देशातील मुस्लीम, दलित समाजातील लोकांवर अनन्वित अत्याचार झाले. गोमांसावरून निर्घृण हत्या घडल्या. या घटना निंदनीय असून अशा घटना समाजातील एकोपा नष्ट करण्यास कारणीभूत ठरत असून, अशा घटना घडू नयेत म्हणून कायदा – व्यवस्थेचे कडक कायदे अस्तित्वात येणे गरजेचे आहे. देशातील अल्पसंख्याकांना त्याचप्रमाणे कृषिप्रधान आपल्या देशात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याच्या घटना वाढत आहेत. त्यावर तातडीने करावयाचा उपाय म्हणजे पिकाला योग्य हमीभाव देणे. असे केल्याने शेतकरी कर्जबाजारी होण्याचे प्रमाण घटेल. त्याचप्रमाणे देशाच्या अर्थसंकल्पातील ६ % खर्च शिक्षणावर होणे गरजेचे आहे. मात्र मागील काही वर्षांत हे प्रमाण २ टक्के असल्याने शिक्षण क्षेत्रात फारशी प्रगती न झाल्याचे चित्र आहे. -अरुण गावडे, मेकॅनिकल इंजिनिअर

- Advertisement -

व्यापक देशहिताचा विचार व्हावा

लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना व्यापक देशहिताचा प्रथम विचार व्हायला हवा. त्यामुळे पक्ष आणि उमेदवार हे दोन्ही घटक महत्वाचे आहेत. पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असावा. कारण लोकसभेत जाऊन देशपातळीवरील प्रशासन चालवायचे आहे. तो पक्ष जिंकून आल्यावर देशाला खंबीर नेतृत्व देऊ शकेल की नाही याचा अंदाज बांधता आला पाहिजे. पंतप्रधान म्हणून कोणता चेहरा पक्षाने पुढे आणला आहे? ती व्यक्ती त्या पदासाठी किती सक्षम आहे? स्वयंनिर्णय घेऊ शकते का? आंतरराष्ट्रीय पातळीवर तीचे वजन किती आहे? ती देशाला गौरव प्राप्त करून देऊ शकेल का? त्याचप्रमाणे देश एकसंघ ठेऊ शकेल का? देशातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे का या मुद्यांकडे नक्कीच लक्ष द्यायला हवे. त्यानंतर आपल्या भागातील उमेदवाराचे कार्य देखील विचारात घ्यायला हवे. त्याचा जनसंपर्क कसा आहे? त्याचे शिक्षण किती? त्याची सामाजिक कार्याची आवड कितपत खरी आहे? याबरोबरच तो पक्षाशी किती एकनिष्ठ आहे? त्याचा पूर्वेतिहास गुंडगिरीचा नाही ना? या सर्व मुद्यांचा विचार मतदान करताना करायलाच हवा. -बाळासाहेब बी. जाधव, मा. प्राचार्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -