घरमुंबईपालिकेतही राष्ट्रवादीला धक्का; जोगेश्वरीच्या नाजीया शेख यांचे सदस्यत्व रद्द

पालिकेतही राष्ट्रवादीला धक्का; जोगेश्वरीच्या नाजीया शेख यांचे सदस्यत्व रद्द

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोगेश्वरी (पूर्व) येथील प्रभाग क्रमांक ७८ च्या नगरसेविका नाजीया अब्दुल जब्बार सोफी यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे मुंबई महापालिका सदस्यत्व आज, सोमवारी रद्द करण्यात आले. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापालिका सभागृहात सोमवारी ही घोषणा करत त्यांचे महापालिका सदस्यत रद्द करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रभाग क्रमांक ७८ मध्ये शिवसेनेच्या नेहा खुर्शिद आलम शेख या दुसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या आता ८ इतकी झाली आहे.

महापालिकेच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण ९ नगरसेवक निवडून आले आहेत. यामध्ये जोगेश्वरीतील मेघवाडी रोड २ आणि शनि महाराज मंदिर येथील प्रभाग क्रमांक ७८ मध्ये इतर मागास प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाजीया अब्दुल जब्बार सोफी या ४०१२ मते मिळवून विजयी झाल्या होत्या. तर दुसर्‍या क्रमांकावर शिवसेनेच्या नेहा खुर्शिद आलम शेख यांना २९३४ मते मिळाली होती. तब्ब्ल ११०० मतांनी नाजीया यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

- Advertisement -

नाजीया यांच्या जातप्रमाणपत्राबाबत शिवसेनेच्या उमेदवारांनी जातपडताळणी समितीपुढे तक्रार केल्यानंतर समितीने केलेल्या पडताळणीमध्ये त्यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले. त्यानुसार सहायक करनिर्धारण व संकलन (निवडणूक) यांनी २० सप्टेंबर २०१९रोजी महापालिका चिटणीस विभागाला पत्र पाठवून त्यांचे जातप्रमाणपत्र अवैध असल्याचे कळवले होते. त्याप्रमाणे हे पत्र महापालिकेच्या सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. त्यानुसार महापालिका सभागृहात या पत्राला मंजुरी देत नाजीया यांचे महापालिका सदस्यत्व रद्द होत असल्याचे महापौरांनी घोषित केले. नाजीया यांचे २३ फेब्रुवारी २०१७ पासून महापालिका सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -