घरCORONA UPDATELockDown : भररस्त्यात विवस्त्र होऊन तळीरामांनी घातला गोंधळ

LockDown : भररस्त्यात विवस्त्र होऊन तळीरामांनी घातला गोंधळ

Subscribe

दारूच्या नशेत या तळीरामांकडून कायद्याची  पायमल्ली होत असल्याचे चित्र भिवंडी शहरात दिसू लागले आहे.

मद्य विक्री वरील बंदी उठवताच तळीरामांवर दारूची झिंग चढू लागली आहे. दारूच्या नशेत या तळीरामांकडून कायद्याची  पायमल्ली होत असल्याचे चित्र भिवंडी शहरात दिसू लागले आहे. भिवंडीतील कशेळी टोल नाक्याजवळ दारूच्या नशेत असणाऱ्या तळीराम विवस्त्र होऊन एकमेकांशी भररस्त्यात भांडत असताना भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना तळीरामांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी या तळीरामांच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणून तिघांची नशा उतरवली.

भिवंडीतील कशेळी टोल नाका  येथील एकदंताय अपार्टमेंट या ठिकाणी तिघे जण एकमेकांना मारहाण करीत असून त्यातील एक जण पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत असल्याची माहिती नारपोली पोलिसाना मिळाली. पोलिसांनी कशेळी टोल नाका येथे धाव घेतली असता तीन जण दारूच्या नशेत एकमेकांना मारहाण करीत होते, त्यातील एक जण पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत होता. पोलिसांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता नशेत असणाऱ्या तिघांनी उलट पोलिसांवर हल्ला करून त्यांना अर्वाच्य भाषा वापरत होते. विवस्त्र असणाऱ्या तळीरामाने पोलिसांसमोर अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी कसेबसे या तिघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले, मात्र तिथेही तिघेजण पोलिसांना शिवीगाळ करू करून पोलिसांवर हात उगारत होते, अखेर पोलिसांनी थोडे सक्तीने घेत तिघांची नशा उतरवली.

- Advertisement -

जयेश लहू चौधरी (२८),अनिल चौधरी(२८), धिरज छगन पाटील (२१) असे या तिघांचे नावे असून तिघे एकमेकांचे नातेवाईक आहे. या तिघांत क्षुल्लक गोष्टीवरून वाद होऊन तिघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती अशी माहिती  चौकशीत समोर आली. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -