चुलीवरचं जेवण आणि आपुलकीची थाळी

राहुल देशपांडेंनी सोशल मीडियावर शेअर केलेला नाना पाटेकरांचा चुलीवर जेवण बनवताना आणि वाढतानाचा व्हिडिओ चर्चेत .

Gadima Award announced to actor Nana Patekar
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना गदिमा पुरस्कार जाहीर

अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी असो वा मराठी चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने सर्वांच्याच मनावर स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. चित्रपट कोणताही असो नाना पाटेकर यांचा त्यातला अभिनय आणि त्यांचे संवाद प्रेक्षकांच्या नेहमीच लक्षात राहतात. त्यांच्या अभिनयाच्या ताकदीवर अनेक चित्रपट हिट सुद्धा झाले आहेत.

गेली अनेक वर्षे ग्लॅमरस सिनेसृष्टीत असून सुद्धा नाना पाटेकर हे त्यांच्या खऱ्या खुऱ्या आयुष्यात मात्र अगदी साधेपणाने राहतात. शिवाय हा साधेपणा त्यांच्या व्यक्तित्वात दिसतो. दरम्यान, नाना पाटेकर हे आपल्या माणसांची आपुलकीने चौकशी करतात, काळजी घेतात. त्याचं उत्तम उदाहरण एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी नुकताच नाना पाटेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर हे चुलीजवळ बसून स्वतः जेवण बनवताना दिसत आहेत. बनवलेलं जेवण सर्वांना हाक मारून, बोलावून आपुलकीनं जेऊ घालत आहेत.

नाना पाटेकरांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नाना पाटेकरांच्या या व्हिडिओवर त्यांच्या चाहत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत.