घरताज्या घडामोडीमहाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड, काँग्रेसने केली अधिकृत घोषणा

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड, काँग्रेसने केली अधिकृत घोषणा

Subscribe

महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदावर असणारे सर्व तर्क वितर्क संपुष्टात आणतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दिल्लीतून ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून याबाबतची अधिकृत घोषणा आज शुक्रवारी दुपारी करण्यात आली. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा गुरूवारी राजीनाम दिला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी ही घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करतानाच कार्याध्यक्षाची पदासाठी सहा जणांची घोषणा केली आहे. AICC nana patole

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिली होती. गुरूवारी पक्षश्रेष्ठींनी राजीनामा द्यायला सांगितल्यानेच मी राजीनामा दिला आहे, असे नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्याचवेळी पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी घेईन असे पटोले म्हणाले होते. आता राज्याच्या विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाल्याने महाविकास आघाडीत या जागेसाठी स्पर्धा रंगली आहे.

- Advertisement -

काँग्रेस कार्याध्यक्षपदी सहा जण

१. शिवाजी मोगे

२. बसवराज पाटील

- Advertisement -

३. नसीम खान

४. कुणाल पाटील

५. चंद्रकांत हंडोरे

६. प्रणिती शिंदे

 

उपाध्यक्षपदी

१ शिरीष चौधरी
२. रमेश बागवे
३. हुसैन दलवाई
४. मोहन जोशी
५. रणजित कांबळे
६. कैलास गोरंट्याल
७. बी आय नगराळे
८. शरद अहेर
९. एम एम शेख
१०. माणिक जगताप

 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -