धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नका – नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान करत संपूर्ण वारकरी संप्रदयाचाच अपमान केला आहे

Nana Patole clarified the role of Congress to fight against BJP

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर, प्रवचनकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना मुंबईतील कार्यक्रमासाठी
परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती करणारे पत्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्य
मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

धीरेंद्र शास्त्री यांचा १८ आणि १९ मार्च रोजी मुंबईत कार्यक्रम आहे. पण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान करत संपूर्ण वारकरी संप्रदयाचाच अपमान केला आहे. यामुळे लाखो वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
शास्त्रीना कार्यक्रमास परवानगी देण हे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखे आहे. असा मजकूर असलेले पत्र पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.