घरताज्या घडामोडीफोन टॅपिंगमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढा, नाना पटोलेंची मागणी

फोन टॅपिंगमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढा, नाना पटोलेंची मागणी

Subscribe

टॅपिंग प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल

राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंग संदर्भात गंभीर आरोप सभागृहात केले. माझे फोन टॅपिंग २०१६-१७मध्ये झाले आहे. या काळात मी खासदार असताना माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काही कारण नव्हते. पाळत ठेवण्यासाठी फोन नंबर टॅप करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केला आहे. माझ्यासाठी अमजत खान हा कोड ठेवण्यात आला असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. पुणे पोलीस कमिशनरच्या माध्यमातून हे फोन टॅपिंग करण्यात आले. फोन टॅपिंग करण्याची गरज काय? या मागे कोण आहे? हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशाने झालेत? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला. नंबर टॅप करण्यासाठी मुस्लिम लोकांची नावे का टाकली. या पद्धतीने हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करुन धर्माच्या नावाने पुन्हा राजकारण करून राज्य पेटवण्याचा उद्देश या मागे होता का? फोन टॅपिंगमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढा. या प्रकरणाची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांनी आजच्या आज द्यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

रावसाबेह दानवे यांच्या पीएचा नंबर त्याचप्रमाणे खासदार संजय काकणे यांचा नंबर टॅब करण्यात आला. कोणाचीही गोपनियता भंग करण्याचा अधिकार संविधानात नाही. तर कोणाच्याही गोष्टी ऐकल्या तर पापात जाता असे धर्मात म्हटले आहे. सुसंस्कृत लोक धर्माच्या नावाने राजकारण करतात.

- Advertisement -

महाराष्ट्रात बदल्यांचे राजकार कधीच झाले नव्हते. तुमचा अनिल देशमुख आणि छगन भुजबळ करुन टाकू अशा धमक्या भास्कर जाधव यांना देण्यात येत आहेत. भविष्यात २८८ आमदारांच्या बाबतीत अशाप्रकारचे फोन टॅपिंग होऊ शकते. याआधीही असे प्रकार घडले असतील. या सगळ्याची गृहखात्याने चौकशी करुन सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत. फोन टॅपिंग करुन लोकशाहीचा खून करण्यात आलाय. त्यामुळे याची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली पहिजे असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टॅपिंग प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी – गृहमंत्री 

फोन टॅपिंग प्रकरण अतिशय गंभीर असून फोन फोन टॅपिंग करण्याआधी परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे टॅपिंग प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राजदंड पळवणाऱ्या स्टंटबाज रवी राणांना सभागृहाबाहेरचा रस्ता

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -