Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई बिग बी आणि अक्षयचे सिनेमे बंद पाडण्याचा नाना पटोलेंचा इशारा तर आठवलेंचा...

बिग बी आणि अक्षयचे सिनेमे बंद पाडण्याचा नाना पटोलेंचा इशारा तर आठवलेंचा पाठिंबा

रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी कलाकांची बाजू घेत काँग्रेसवरच पलटवार

Related Story

- Advertisement -

काँग्रेस नेते नाना पटोले हे इंधन दरवाढीविरोधात आक्रमक झालेले दिसत आहेत. काँग्रेसने बॉलिवूड कलाकरांवर चांगलाच निषाणा साधल्याचे दिसून येत आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमे महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. युपीएचे सरकार असताना पेट्रोल दरवाढीविरोधात अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यासारख्या अनेक सेलिब्रेटींनी ट्विटच्या माध्यमातून सरकारवर टिका केली होती. मात्र आता झालेल्या दरवाढीविरोधात हेच कलाकार मुक गिळून गप्प बसले आहेत. भाजपच्या इशाऱ्यावर टिव टिव करणाऱ्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे सिनेमे आणि त्याचे शुटींग बंद पाडू असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे. तर या प्रकरणात रिपब्लिक पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी कलाकांची बाजू घेत काँग्रेसवरच पलटवार केला आहे. त्यामुळे आता नाना पटोले बॉलिवूड कलाकारांच्या विरोधात असले तरी रामदास आठवले त्यांना पाठिंबा देत आहेत.

- Advertisement -

रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंनी ट्विट करत नाना पटोलेंच्या धमकीचा विरोध केला. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी महानायक अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचे शुटींग बंद पाडण्याची जी धमकी दिली आहे त्या धमकीचा आम्ही विरोध करतो. अमिताभ आणि अक्षय यांच्या सिनेमांना रिपब्लिक पक्ष संरक्षण देईल, असे रामदास आठवले यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर त्यांनी असेही म्हटले आहे की, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात इंधन दरवाढीविरोधात ट्विट करुन त्याचा विषेध केला होता. याच अर्थ असा होत नाही की त्यांनी आजही इंधन दरवाढीविरोधात ट्विट करावे. नाना पटोलेंनी अशा धमक्या देणं चांगली गोष्ट नाही, असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेची बोलताना सांगितले. इंधन दरवाढीविरोधात  नाना पटोले यांच्या टिकेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी शंभरी गाठली आहे. वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती पाहून नागरिकही संताप व्यक्त करत आहेत.


हेही वाचा – Corona Update: पुणेकरांनो काळजी घ्या! आज कोरोना रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ

- Advertisement -