कोणत्या दिशेला आपली वाटचाल सुरू आहे? नाना पटोलेंचा मोदी सरकारला सवाल

Nana Patole criticizes Central government increase CNG prices
महाराष्ट्राने CNG भाव कमी केला परंतु केंद्राने वाढवून अडथळा आणला, नाना पटोलेंची केंद्रावर टीका

मुंबई : एकीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करून केंद्र सरकारने शेजारील राष्ट्रांतून भारतात आलेल्या मुस्लीम वगळता इतर धर्माच्या शरणार्थींना देशाचे अधिकृत नागरिकत्व देऊ केले. तर, दुसरीकडे गेल्या तीन वर्षांत सुमारे चार लाख नागरिकांना दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले आहे. त्यावरून काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

साधारणपणे अडीच वर्षांपूर्वी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (CAA) अधिसूचना जारी केली होती. या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश, आणि अफगाणिस्तानमधून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्यांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. त्याला त्यावेळी देशभरात तीव्र विरोध करण्यात आला होता. तर, गेल्या 3 वर्षांत 3.92 लाख भारतीय नागगरिकांनी भारताचे नागरिकत्व सोडून इतर देशांना जवळ केले आहे. भारतातील या नागरिकांनी आता विविध 120 देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. यापैकी सर्वाधिक 1.70 लाख लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. या लोकांनी वैयक्तिक कारणांमुळे भारताचे नागरिकत्व सोडल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण सरसकट देशभरात लागू करा, छगन भुजबळांची मागणी

2021मध्ये सुमारे 1.63 लाख भारतीयांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. यापैकी 78,284 भारतीयांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे, तर 23,533 लोकांनी ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व घेतले आहे. त्याचवेळी, 21,597 लोकांनी कॅनडा आणि 14,637 लोक ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले आहे.

यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ही बाब धक्कादायक आहे. देशातील जनतेला आपल्याच देशात राहावेसे वाटत नाही तर, मग नक्की कोणत्या दिशेला आपली वाटचाल सुरू आहे, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. ही बाब मोदी सरकारने गंभीरतेने घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

हेही वाचा – ओसीबी आरक्षणावर आघाडी आणि महायुतीचे दावे-प्रतिदावे