घरताज्या घडामोडीनानावटी रुग्णालयाकडून अमिताभ यांच्याबद्दलच्या 'त्या' मेसेजवर स्पष्टीकरण!

नानावटी रुग्णालयाकडून अमिताभ यांच्याबद्दलच्या ‘त्या’ मेसेजवर स्पष्टीकरण!

Subscribe

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना तातडीने नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाठोपाठ अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि आराध्या हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी बच्चन कुटुंबीयांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. अमिताभ बच्चन यांनी नानावटीमध्ये मिळत असलेले उपचार, सुविधा यावर एप्रिल महिन्यात केलेला व्हिडिओ संदेश व्हायरल होऊ लागला. या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन हे नानावटी रुग्णालयाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला होता. त्यावर आता खुद्द नानावटी रुग्णालय ज्यांच्या मालकीचे आहे, त्या रेडिअंट ग्रुपने स्पष्टीकरण दिलं आहे.

काय होतं व्हायरल मेसेजमध्ये?

नानावटी रुग्णालय ज्या रेडिअंट ग्रुपचं (Radiant Group) आहे, त्या ग्रुपमध्ये अमिताभ बच्चन हे देखील एक संचालक असून कंपनीचे भागीदार देखील आहेत. नानावटी रुगणालयाची प्रतिमा सुधारण्यासाठीच कोरोनाची लक्षणं नसूनही अमिताभ बच्चन नानावटीमध्ये दाखल झाले. शिवाय, त्यांच्या बंगल्यात देखील त्यांच्या सेवेसाठी दोन पूर्णवेळ डॉक्टर असून आयसीयू वॉर्ड देखील आहे. मात्र, तरीदेखील ते नानावटीमध्ये दाखल होऊन उपचार घेत आहेत असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला होता.

- Advertisement -

रेडिअंट ग्रुपनं काय केला खुलासा?

दरम्यान, नानावटी रुग्णालय ज्या रेडिअंट ग्रुपच्या मालकीचं आहे, त्या ग्रुपनं हा दावा खोटा असल्याचं स्पष्टीकरण केलं आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेडिअंट ग्रुप यांचा काहीही संबंध नाही. रेडिअंट ग्रुपच्या संचालक मंडळावरच्या सहा सदस्यांमध्ये बच्चन नाहीत. त्यात ते असिम्टोमॅटिक नसून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत आहेत. आणि ६५ वर्षांवरील रुग्णांना कोरोनाचा अधित धोका असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना रुग्णालयात दाखल करून घेण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून अमिताभ बच्चन यांना दाखल करून घेतलं असल्याचं रेडिअंट ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -