…म्हणून उद्धव ठाकरेंना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत आहे, नारायण राणेंचा टोला

आज केंद्री मंत्री नारायण राणे एका कार्यक्रमासाठी नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली.

Narayan Rane
नारायण राणे

आज केंद्री मंत्री नारायण राणे एका कार्यक्रमासाठी नवी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली. उध्दव ठाकरेंना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याचे सांगत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंची खाल्ली उडवली.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच –

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचे राणे म्हणाले. मंत्रिमंडळाची निवड झाले आहे. ते लवकरच घोषीत केले जाईल. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. कारण आज ते कोणी नाहीत, असे राणे म्हणाले. मराठी उद्योजकता दिवसाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. मनोज भटीर, रामदार माने, अशोक दोगाडे, विनित बनसोडे आदी उपस्थित होते. मराठी उद्योजक प्रचंड संख्येने या सभागृहात होते.

जोडत फिरावे लागत आहे –

केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या फोननंतर उद्धव ठाकरे रागावले असल्याचे कोणी पाहिले? ते एकटेच घरात होते. त्यामुळे फारफार तर त्यांच्या पत्नींने पाहिले असेल, असा खोचक टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना मारलाय. राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरे कोण आहेत, त्यांच अस्तित्व काय, त्यांना इतरांकडे हात जोडत फिरावे लागत असल्याचे सांगत नारायण राणे यांनी ठाकरे यांची खाल्ली उडवली आहे. यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल अशी प्रतिक्रिया देखील नारायण राणे यांनी दिली. सॅटरडे क्लबतर्फे आयोजित मराठी उद्योजक दिवस सोहळ्यासाठी नारायण राणे नवी मुंबईत आले होते त्यावेळी ते बोलत होते.