दाभोलकर हत्येचा तपास पूर्ण; सीबीआयची उच्च न्यायालयात माहिती

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा तपास समाधानकारक नाही. त्यामुळे न्यायालयाने या तपासावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका मुक्ता दाभोलकर यांनी adv अभय नेवगी यांच्यामार्फत केली आहे. मात्र या हत्येतील आरोपींनी २०२१ मध्ये न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर लक्ष ठेवू नये, अशी मागणी आरोपींनी न्यायालयात केली.

narendra-dabholkar
डॉ. नरेंद्र दाभोलकर

 

मुंबईः डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला आहे. त्याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी सादर केला आहे. पुढील तपासाची आवश्यकता नाही, अशी माहिती केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) सोमवारी उच्च न्यायालयात दिली.

न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर Additional Solicitor General (ASG) अनिल सिंग यांनी सीबीआयच्यावतीने ही माहिती दिली. डॉ. दाभोलकर हत्येचा तपास पूर्ण झाला आहे. तपासाचा अंतिम अहवाल मंजुरीसाठी उच्च अधिकाऱ्यांकडे दिला आहे. या हत्येच्या खटल्यात ३२ साक्षीदारांपैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे, असे Additional Solicitor General (ASG) सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालय म्हणाले, डॉ. दाभोलकर हत्येचा तपास पूर्ण झाला की नाही याची माहिती सादर करा, जेणेकरुन या खटल्यावर लक्ष ठेवावे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ.

२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा तपास समाधानकारक नाही. त्यामुळे न्यायालयाने या तपासावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी करणारी याचिका मुक्ता दाभोलकर यांनी adv अभय नेवगी यांच्यामार्फत केली आहे. मात्र या हत्येतील आरोपींनी २०२१ मध्ये न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर नियंत्रण ठेवू नये, अशी मागणी आरोपींनी न्यायालयात केली.

आरोपींच्या अर्जाला adv नेवगी यांनी विरोध केला. सीबीआयने दाभोलकर हत्येचा तपास योग्यप्रकारे केलेला नाही. यामध्ये अजून काही आरोपींचा सहभाग आहे. ते एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे न्यायलयाने या तपासावर नियंत्रण ठेवावे, असा युक्तिवाद adv नेवगी यांनी केला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर तपासावरील न्यायालयाचे नियंत्रण संपुष्टात येते. आतापर्यंत तीन आरोपपत्र दाखल झाले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालनही झाले आहे, असे आरोपींच्यावतीने adv सुभाष झा यांनी न्यायालयाला सांगितले.

त्यावर न्यायालय म्हणाले, तपास व खटला हा धमकीपेक्षा वेगळा असतो. साक्षीदार या सर्व गोष्टी आम्हाला सांगू शकत नाही. पण तपास यंत्रणा सर्व तपशील देऊ शकते. त्यामुळे याची माहिती तपास यंत्रणेने न्यायालयाला द्यावी.