घरमुंबईअंबरनाथच्या अक्षतची अठराव्या वर्षी भरारी

अंबरनाथच्या अक्षतची अठराव्या वर्षी भरारी

Subscribe

नासाचा आशियातील सर्वात तरुण प्रशिक्षणार्थी शास्त्रज्ञ

अंबरनाथच्या वांद्रपाडा अर्थात सुभाष वाडी येथे जन्मलेल्या आणि सध्या ठाण्यात शिक्षण घेत असलेल्या अक्षत अविनाश मोहिते या अवघ्या अठरा वर्षाच्या युवकाने जगातील दुसरा तर आशियामधील पहिला नासाचा सर्वात तरुण प्रशिक्षणार्थी शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान मिळवला आहे. येत्या रविवारी राष्ट्रीय अवकाश संस्था मुंबई अर्थात नॅशनल स्पेस सोसायटी मुंबई या संस्थेचे उद्घाटन ठाणे येथे होत असून या संस्थेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अक्षत मोहितेवर आहे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ही भरारी अक्षतने घेतली आहे. नासाचे सौर प्रकल्पाचे अ‍ॅम्बेसेडर डॉ. रवी मार्गसह्यम यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

अक्षतचे वडील अविनाश मोहिते हे अंबरनाथ येथील फातिमा विद्यालयाचे विद्यार्थी असून ते अंबरनाथमध्ये नोकरी व्यावसायानिमित्त राहाण्यास गेले. या ठिकाणीच अक्षतचा जन्म झाला. अक्षतला इयत्ता आठवीत असल्यापासूनच विज्ञान विषयाची गोडी लागली होती. दहावीत असताना लॉस एंजेलिस येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत अवकाश तंत्रज्ञान विषयावरील संशोधक प्रशिक्षणार्थी शास्त्रज्ञ म्हणून अक्षत मोहितेची निवड झाली. अक्षत हा जगातील दुसरा आणि आशियामधील पहिला नासातील सर्वात तरुण प्रशिक्षणार्थी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. नासासाठी काम करत असताना तो बारावीचे शिक्षण घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -