घरमुंबईNaseeruddin Shah : 'अल्ला हूं अकबर' म्हणत मते मागितली तर...

Naseeruddin Shah : ‘अल्ला हूं अकबर’ म्हणत मते मागितली तर…

Subscribe

मुंबईः अल्ला हू अकबर म्हणत मते मागितली असती तर मोठा गदारोळ झाला असता, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते Naseeruddin Shah यांनी केली आहे. मुस्लीम द्वेषावर भाष्य करताना Naseeruddin Shah यांनी केंद्र शासनावरही निशाणा साधला.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत Naseeruddin Shah यांनी मुस्लीम द्वेषावर आपली मते मांडली. काही चित्रपट आणि टीव्ही शोचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. मतांसाठी हा खटाटोप सुरु आहे. सत्ताधारी पक्ष याचा चतुराईने वापर करत आहे. खरं तर मुस्लीम द्वेष ही शिकलेल्या लोकांची फॅशन झाल आहे, असे परखड मत Naseeruddin Shah यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

अल्ला हू अकबर म्हणत मते मागितली असती तर आतापर्यंत गदारोळ झाला असता. सध्या जे सुरु आहे त्यावर निवडणूक आयोग मौन बाळगून आहे. मतांसाठी धर्माचा वापर होत आहे. तरीदेखील निवडणुक आयोग कारवाई का नाही करत, असा सवाल Naseeruddin Shah यांनी उपस्थित केला.

भारतीय मुस्लीमांना सुनावले होते खडेबोल

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळवल्यानंतर काही भारतीय मुस्लिमांनी आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी Naseeruddin Shah यांनी आनंद साजरा करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना खडेबोल सुनावले होते. अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी  मिळवणे ही संपूर्ण भारतीयांसाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. मात्र भारतीय मुस्लिमांपैकी काही लोकं या विदारक घटनेचा आनंद साजरा करताना दिसत आहेत. जे नागरिक दहशतावाद्यांच्या वापसीनंतर अत्यंत खुश आहेत. त्या भारतीय मुस्लिमांनी स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की इस्लामला सुधारणा आणि आधुनिकतेची गरज आहे की जुन्या काळात सुरु असलेली क्रुरतेची?, असा सवाल Naseeruddin Shah  यांनी केला होता. मी हिंदुस्तानी मुस्लिम आहे. मिर्झा गालिबने म्हटल्याप्रमाणे, अल्लाह सोबत माझे नाते खूप वेगळे आहे, मला राजकीय धर्माची गरज नाही. भारतातील इस्लाम हा जगातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा आहे. देव अशी वेळ आणू नये की ती इतकी बदलते की आपण ती ओळखूही शकत नाही, असेही Naseeruddin Shah यांनी सांगितले होते.

- Advertisement -

शेतकरी आंदोलनावरून सेलिब्रेटींना टोला

दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु असताना त्यावर भाष्य न करणाऱ्या सेलिब्रेटींवरही Naseeruddin Shah यांनी टीका केली होती.  जेव्हा सगळे उध्वस्त झाले असेल तेव्हा तुमच्या शत्रुंचाही आवाज येणार नाही. तुम्हाला तुमच्या मित्रांची शांतता पण जास्त त्रास देईल. मला काही फरक पडत नाही. असे बोलूनही चालणार नाही. जर शेतकरी कडाक्याच्या थंडीत ठाण मांडून बसले आहेत. तर मला काही फरक पडत नाही असे बोलू शकता. परंतु मला खात्री आहे की, शेतकऱ्यांचे आंदोलन वाढेल तीव्र होईल. आणि सामान्य जनताही यामध्ये सहभाग घेईल. शांत बसून राहणे हे अन्याय करणाऱ्याला मदत केल्यासारखे आहे. सिनेसृष्टीत मोठं-मोठे दिग्गज शांत आहेत. कारण त्यांना भिती आहे की, त्यांनी काही वक्तव्य केले तर खुप काही गमावू शकतो. जर अमाप पैसा कमवला आहे. तुमच्या सात पिढ्या बसून खातील एवढे कमावले आहे तर तुम्ही किती गमवाल?, असा टोला Naseeruddin Shah यांनी लगावला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -