Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई नाशिक आयटीआय होणार मॉडेल आयटीआय - राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय Nashik ITI will...

नाशिक आयटीआय होणार मॉडेल आयटीआय – राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय Nashik ITI will be a model ITI – decision of the state cabinet

स्थानिक उद्योग धंद्यांच्या मागणीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून देण्यात येणार्‍या व्यवसाय प्रशिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच प्रशिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट होण्यासाठी राज्यातील किमान एका विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मॉडेल आय.टी.आय म्हणून दर्जावाढ करण्यात येईल.

Related Story

- Advertisement -

नाशिक येथील आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस मॉडेल आयटीआय करण्यास गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी ८ कोटी ९९ लाख रुपयांच्या प्रकल्प किमतीस केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. यात केंद्र आणि राज्याचा हिस्सा ७० : ३० असा आहे. जागतिक बँक सहाय्यित स्ट्रीव्ह प्रकल्पांतर्गत या संस्थेचा समावेश केला आहे. स्ट्रीव्ह प्रकल्पांतर्गत स्थापन केलेली आणि सोसायटी रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणी केलेली आयएमसी सोसायटी योजनेची अंमलबजावणी करील. आयएमसीला सर्व व्यवसायाच्या उपलब्ध जागेच्या २० टक्के जागांवर प्रवेश अधिकार राहतील.

स्थानिक उद्योग धंद्यांच्या मागणीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून देण्यात येणार्‍या व्यवसाय प्रशिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच प्रशिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट होण्यासाठी राज्यातील किमान एका विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा मॉडेल आय.टी.आय म्हणून दर्जावाढ करण्यात येईल. ही औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थानिक उद्योगधंद्याच्या मागणीनुसार कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे केंद्र म्हणून काम करील. स्थानिक औद्योगिक आस्थापनांसोबत प्रभावी संबंध राखणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण सुविधांचा इष्टतम वापर करण्यासाठी दुसरी आणि तिसरी पाळी सुरू करणे, औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या मनुष्यबळाला या संस्थेत प्रशिक्षण घेण्यासाठी आकर्षित करणे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना प्रशिक्षण देणे, ही या केंद्राच्या कामाची उद्दिष्ट्ये असतील.

- Advertisement -

मॉडेल आय.टी.आय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी, उच्च दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था राहणार असून औद्योगिक आस्थापनांसोबत प्रभावी समन्वय स्थापणारी संस्था म्हणून विकसित करण्यात येईल. या संस्थेने योजनेअंतर्गत केलेल्या आदर्श कामगिरीचे अनुकरण राज्यातील इतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये करणे अपेक्षित आहे.
स्थानिक उद्योगधंद्यांना अपेक्षित असलेली कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेणे, यासाठीचे आवश्यक ते प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, यातील पायाभूत सुविधांची यादृष्टीने दर्जोन्नती करणे, ग्रंथालय, वर्कशॉप, संगणक लॅब, माहिती तंत्रज्ञान सुविधांची दर्जोन्नती, तेथील स्वच्छता, सुरक्षितता आणि दर्जावाढ याकडे लक्ष देणे, पर्यवेक्षकाच्या रिक्त जागा भरणे, प्रशिक्षित मनुष्यबळाला नोकरी मिळवून देण्यासाठी सेलची स्थापना करणे, यासाठी स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती करणे, कालबाह्य व्यवसाय बदलणे, अशा वेगवेगळ्या महत्वाच्या कामांची पूर्तता या मॉडेल आयटीआयकडून अपेक्षित आहे.

- Advertisement -