Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई नवी मुंबईचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांची आत्महत्या

नवी मुंबईचे माजी नगरसेवक भोलानाथ ठाकूर यांची आत्महत्या

Related Story

- Advertisement -

दिघा येथील माजी नगरसेवक भोलानाथ महादशेठ ठाकूर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी नवी मुंबईमध्ये घडली आहे. भोलानाथ ठाकूर हे गणेश नाईकांची साथ सोडुन भाजपातून शिवसेनेत आले होते. त्यांच्या आत्महत्येमुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. भोलानाथ ठाकूर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

भोलानाथ ठाकूर हे नवी मुंबई महानगर पालिकेच्या ईश्वरनगर दिघा प्रभाग क्र. १ येथील माजी नगरसेवक होते. तसेच ते दिघ्यामधील ईश्वरनगर येथे वास्तव्यास होते. नाईक समर्थक गणले जाणारे भोलानाथ ठाकूर यांनी राष्ट्रवादी सोडून नाईकांसोबत भाजपत प्रवेश केला होता. मात्र, भाजपत काही जमले नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

- Advertisement -

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. परंतु शुक्रवारी अचानक त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. ईश्वनगर दिघा येथे त्यांचा बंगला आहे. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी धावाधाव केली. मात्र, भोईर मृत झाले होते. त्यांच्या आत्महत्येमुळे संपूर्ण नवी मुंबईकरांना धक्का बसला असून दिघा विभागात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुले आहेत.

- Advertisement -