घरCORONA UPDATEआरोग्य केंद्रे, रुग्णालयावर महापौर ठेवणार वॉच!

आरोग्य केंद्रे, रुग्णालयावर महापौर ठेवणार वॉच!

Subscribe

कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गातून होत असल्यामुळे वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या वतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात कोणीही घराबाहेर न पडता घरीच स्वत:ची व आपल्या परिवाराची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी बेलापूर ते दिघा येथील आठही विभाग कार्यालय व नागरी आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये यांना भेट देऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीची व उपाययोजनांची पाहणी केली.

नवी मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून नवी मुंबईकर नागरिकांविषयीच्या काळजीच्या भावनेने महापौर जयवंत सुतार यांनी विभागवार परिस्थितीची पाहणी करत नागरिकांना अत्यावश्यक सुविधा वेळच्या वेळी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सुयोग्य नियोजन करावे अशा सूचना केल्या. त्याचप्रमाणे नवी मुंबईकर नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविताना अधिकारी, कर्मचारी वर्गानेही आपल्या प्रकृतीची सुरक्षा साधनांचा वापर करून काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

जागतिक परिस्थिती बघता नवी मुंबईकर नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन घरातच थांबावे व जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी थोड्या वेळासाठी बाहेर आले तरी हातरूमाल किंवा मास्कचा वापर करावा व एकमेकांपासून किमान १  मिटर अंतर ठेवावे आणि लगेच घरी जावे असे आवाहन महापौर जयवंत सुतार यांनी केले आहे.


हे ही वाचा – नागपुरात चार तर गोंदियात एक नवा रुग्ण, आकडा १३५वर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -