घरमुंबईनवी मुंबई पालिकेला शौचालयांमधून लाखो रूपये!

नवी मुंबई पालिकेला शौचालयांमधून लाखो रूपये!

Subscribe

सार्वजनिक शौचालयांच्या नूतनीकरणातून नवी मुंबई महानगरपालिकेला लाखो रुपयांचा फायदा होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणसाठी नवी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. त्यासाठी आता शौचालयांचा कायापलाट करण्यात येणार आहे. त्यातून आता नवी मुंबई महानगरपालिकेला लाखोंचा फायदा देखील होणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील शौचालये कायमस्वरुपी वापरण्यायोग्य स्थितीत असावीत या भूमिकेतून शौचालयांच्या नियमित स्वच्छतेकडे व देखभालीकडे आयुक्तांनी विशेष लक्ष दिले देण्याचे सूचित केले आहे. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने आयुक्त करीत असलेल्या पाहणी दौऱ्यातही शौचालयांची सद्यस्थिती सुधारण्यासाठी सूचना करण्यात येत आहेत. शिवाय, त्यांचा आढावा देखील घेतला जात आहे. नवी मुंबईतील शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी आता पीपीपी सुत्राचा वापर करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी घेतला आहे. पालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून शौचालयाच्या बाहेरील भागांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यासाठी कंत्राटदारास शौचालयाच्या भिंतींवर तसेच वरील भागात जाहीरात करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये कंत्राटदारामार्फत ५०२ सार्वजनिक व सामुदायिक शौचालये तसेच ई-टॉयलेट यांच्या बाहेरील भागात आकर्षक रंगरंगोटी केली जाणार आहे.

परिणामी, आता पालिकेला कराव्या लागणार्‍या खर्चात देखील बचत होणार आहे. शौचालयाच्या भिंतीवर जाहिरातींसाठी जागा उपलब्ध होणार असल्याने कंत्राटदाराकडून महानगरपालिकेला ५ वर्षात ४२ लाख इतकी रक्कम मिळणार आहे. पीपीपी योजनेतंर्गत ३५० शौचालयांच्या रंगरंगोटीचं काम पूर्ण झाले आहे. जाहिरातीसाठी जागा उपलब्ध होणार असल्याने कंत्राटदाराकडून महानगरपालिकेस ५ वर्षात ४२ लाख इतकी रक्कम मिळणार आहे. आत्तापर्यंत ५० शौचालयांसमोरील परिसरात मन प्रसन्न करणारे सुशोभिकरण करण्यात आले आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांनी देखील समाधान व्यक्त करत पालिकेच्या उपक्रमाची स्तुती देखील केली आहे. दरम्यान, या सार्‍या बाबीचं नीटपणे नियोजन व्हावं यासाठी शौचालयाशी संबंधित सर्व कामे एकाच कंत्राटदारामार्फत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -