घरमुंबईनवी मुंबई पालिकेचा 4 हजार 20 कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प

नवी मुंबई पालिकेचा 4 हजार 20 कोटी रुपयांचा विक्रमी अर्थसंकल्प

Subscribe

सर्वसाधारण सभेची मंजुरी

स्थायी समिती सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये तब्बल 216 कोटी 19 लाख रुपयांची वाढ करून 4 हजार 20 कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. आयुक्तांच्या अंदाजापेक्षा ही रक्कम तब्बल 563 कोटी रुपयांनी जास्त आहे.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी 16 फेब्रुवारीला 3455 कोटी 64 लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीमध्ये सादर केला होता. स्थायी समितीमध्ये दोन दिवस या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यामध्ये 173 कोटी रुपयांची वाढ केली होती. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी 3629 कोटी 44 लाख रुपयांचे अंदाजपत्रक 5 मार्चला सर्वसाधारण सभेमध्ये सादर केले. सर्वसाधारण सभेमध्ये तीन दिवस या विषयावर चर्चा करण्यात आली. बुधवारी झालेल्या सभेमध्ये 20 सदस्यांनी चर्चा केली होती. गुरुवारी शेवटच्या दिवशी फक्त 7 सदस्यांनी चर्चा केली. बहुतांश नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामधील कामांविषयी सूचना केल्या. सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सभागृहाच्यावतीने अंदाजपत्रकामध्ये वाढ सुचविली. महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी सांगितले की, अर्थसंकल्पावर चर्चा करताना सदस्यांनी केलेल्या मौलिक सूचना आयुक्तांना सादर केल्या जातील.

- Advertisement -

शहरातील विकासकामांची हीच गती कायम ठेवून नागरिकांना उत्तमोत्तम नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहर दुर्गंधीमुक्त करण्याच्या अनुषंगाने सदस्यांनी चर्चा केली असून भविष्यात पावसाळ्यात समुद्राचे पाणी शहरात येऊ नये, यासाठी झडपा असलेले नाले बनविणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरात नाला व्हिजन राबविणे महत्त्वाचे आहे. अर्थसंकल्प वास्तववादी असून कामांच्या गतीसाठी आयुक्तांनी अभियांत्रिकी विभाग सक्षम करावा असे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -