अबू आझमींनी केली शहरांच्या नामकरणाची मागणी

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी विधानसभेमध्ये नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांच्या नामकरणाची मागणी केली.

azmi-abu-asim
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आज विधानसभेमध्ये नवी मुंबई, ठाणे आणि पुणे शहरांच्या नामकरणाची मागणी केली. विधानसभेत बोलण्यासाठी आझमी उभे राहिले तेव्हा त्यांनी आपल्या मागणीची सुरुवात करण्याआधीच ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा दिली. पुढे बोलताना त्यांनी नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे केली. केवळ इतक्यावरच न थांबता आझमी यांनी ठाणे आणि पुण्याचे नाव बदलून शिवाजी महाराजांची आई राजमाता जिजाबाई आणि पुत्र संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली.

विधानभवनात नामकरणाची मागणी केली 

मागणीबद्दल बोलताना अबू आझमी म्हणाले की, ‘स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचे नाव ठाणे शहराला देऊन ठाणे शहराचे नाव बदलून ते ‘जिजामाता नगर’ असे करण्यात यावे. तसेच शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवणारे त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुणे शहराचे नामकरण करुन पुण्याला छत्रपती संभाजी नगर नाव द्यावे. शिवाय आपल्या या मागण्यांना संपूर्ण विधानभवन समर्थन देईल, अशी आशा असल्याचे सांगत त्यांनी आपली मागणी विधानभवनात मांडली.

औरंगाबादच्या नामकरणावरून टाळाटाळ

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत नामकरणाचा मुद्दा उपस्थित करताना भाजप सरकारला उद्देशून शध्या शहरांची नावं बदलली जात आहेत. भाजपा सरकार शहराची नाव बदलत आहेत. राज्यात शिवाजी महाराजाचे नाव घेतले जाते, त्यामुळे नवी मुबईचे नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर, ठाण्याचे नाव जिजामाता नगर तर पुण्याचे नाव छत्रपती संभाजी महाराज नगर असे देण्यात यावे, अशी मागणी मी सभागृहात केली. तसेच औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराची नावं नंतर बदला. औरंगजेबाने हिंदु-मुस्लीम ऐक्यासाठी काम केले आहे, असेही आझमी यावेळी म्हणाले.