घरताज्या घडामोडीदेशातील लस उत्पादन क्षमता पुरेशी नसल्यामुळे पालिकेने ग्लोबल टेंडर काढले, नवाब मलिक...

देशातील लस उत्पादन क्षमता पुरेशी नसल्यामुळे पालिकेने ग्लोबल टेंडर काढले, नवाब मलिक यांची माहिती

Subscribe

मुंबई महानगरपालिकेकडून लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर

देशात कोरोनाविरोधात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. सध्या देशात २ लस उत्पादित कंपन्या लसीचे उत्पादन करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यामध्ये सरकारला अडचणी येत आहेत. जागतिक दर्जाच्या लसींना भारतात परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई महानगरपालिकेने लसींच्या खरेदीसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. या टेंडरच्या सहाय्याने मुंबई महानगरपालिका १ कोटी लसींचे डोस खरेदी करणार आहे. भारतात सध्या केंद्र सरकारने रशियातील स्फुटनिक लसीला आणि देशांतर्गत दोन लसींना परवानगी दिली आहे. इतर लस कंपनीने भारतात लस विकण्यात रस दाखवला तर केंद्राकडे पाठपुरावा करु असे राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. केंद्रसरकारने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट व रशियातील स्फुटनिक यांना परवानगी दिली आहे. पण जर इतर कंपनीने यामध्ये रस दाखवला किंवा किंमत सांगितली आणि त्यांना भारतात परवानगी नसेल तर आम्ही केंद्रसरकारला विनंती करू की. या कंपनीला भारतात लसींसाठी मान्यता द्या.मात्र आजच्या घडीला भारतात उत्पादनाची जी क्षमता आहे ती पुरेशी नाही रशियातील स्फुटनिक यांच्याकडून पुरेशी लस उपलब्ध झालेली नाही. त्यासाठीच मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसींसाठी जागतिक टेंडर काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेकडून लस खरेदीसाठी ग्लोबल टेंडर

कोरोना लसींचा तुटवडा असल्यामुळे मुंबई महानगरपालिका लसीकरण गतीने करु शकत नाही आहे. या सगळ्यावर तोडगा काढत आता मुंबई महानगरपालिकेने १ कोटी लसीचे डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. या ग्लोबल टेंडरमुळे मुंबई महानगरपालिका लसीकरण वेगाने पुर्ण करु शकेल यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळेल तर मोठ्या कंपन्याही या टेंडरमध्ये सहभागी होतील.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -