घरमुंबईपश्चिम बंगालमध्ये भाजप २ आकडी जागांवरच यशस्वी होईल, नवाब मलिकांचे मोठे वक्तव्य

पश्चिम बंगालमध्ये भाजप २ आकडी जागांवरच यशस्वी होईल, नवाब मलिकांचे मोठे वक्तव्य

Subscribe

शरद पवारांचा मोदींवर घणाघात

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी जोरात सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीवरुन प्रचार जोमाने सुरु आहेत यामध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी असा दावा केला आहे की, पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकींमध्ये भाजपला २ अंकी संख्येवरच समाधान मानावे लागणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. यावेली जनतेला संबोधित करताना मोदींनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधत चौफेर टीका केली आहे. ममता ददीदींनी पश्चिम बंगालचा विश्वासघात केला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २ अंकी संख्येपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच भाजप सर्वच राज्यात पैसा,सत्ता आणि बळाचा वापर करत आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये असे वातावरण निर्माण करत आहे. जसे की पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. परंतु भाजपला बंगालमध्ये २ अंकी संख्येपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तर आसाममध्ये भाजप सत्तेतून बाहेर होणार आहे. आसाममध्ये निकालानंतर ५० ची संख्या राहील मग अमित शाह यांना कन्याकुमारीचा दौरा करो किंवा पंतप्रधान मोदींनी आसाम, बंगालचा दौरा करो काही फरक पडणार नाही असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

शरद पवारांचा मोदींवर घणाघात

भाजप देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करण्यासाठी जाऊ शकतात परंतु शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी वेळ नाही. देशात बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. परंतु भाजप जातीयद्वेष पसरवत आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : भाजप देशात जातीयद्वेषाचं विष पसरवतय, शरद पवारांची मोदींवर खोचक टीका

- Advertisement -

मोदींचे ममतांवर टीकास्त्र

पश्चिम बंगालच्या लोकांनी ममता बॅनर्जींवर विश्वास दाखवला मात्र बॅनर्जी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एका बाजूला ममता बॅनर्जी सरकार आहे तर दुसऱ्या बाजूला बंगालची जनता आपली कंबर कसुन तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे बंगालमध्ये आशोल परिवर्तन घडवण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये आलो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जींचे मोदींना प्रत्युत्तर

भाजप बंगालमध्ये परिवर्तन नाहीतर दिल्लीमध्ये करणार आहे. मोदींनी म्हटलंय बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत परंतु जर त्यांनी उत्तरप्रदेश, बिहार आणि इतर राज्यापेक्षा बंगालमध्ये महिला सुरक्षित आहेत. मी वन-ऑन-वन खेळण्यासाठी सज्ज आहे. जर भाजपला मत खरेदी करायची असतील तर त्यांच्याकडून पैसे घ्या आणि तृणमूल काँग्रेसला मतदान करा असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी जनतेला केले आहे.


हेही वाचा : ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -