मुंबईच्या माहीम परिसरात NCBची मोठी कारवाई,१५-२० अल्पवयीन मुलांची सुटका

माहीम परिसरातील स्थानिक नागरिकांनी ड्रग्जची तस्करी होत असल्याची तक्रार NCB कडे केली होती.

NCB Action in Mahim Mumbai, release of 15-20 minors
मुंबईच्या माहीम परिसरात NCBची मोठी कारवाई,१५-२० अल्पवयीन मुलांची सुटका

मुंबईच्या माहीम परिसरात काल रात्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ने कारवाई केली असून मोठ्या प्रमाणात चरस सारख्या अमली पदार्थ्यांचा पुरवठा करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. (NCB Action in Mahim Mumbai, release of 15-20 minors) या ड्रग्ज तस्करीत १५ -२० अल्पवयीन मुलांचा समावेश होता. डग्जच्या विळख्यातून या मुलांची NCBने सुटका केलीय. या प्रकरणी एका ड्रग्ज तस्कऱ्याला अटक करण्यात आली असून या कारवाईत NCBने चरस आणि हशीसचा साठा जप्त केला आहे. लहान मुलांना व्यसनांच्या अधीन नेऊन त्यांच्यामार्फत ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी त्यांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. माहीममध्ये शनिवारी रात्री केलेल्या या कारवाईनंतर अल्पवयीन मुलांचे NCBकडून समुपदेशन करण्यात आले असून त्यांना सोडण्यात आले आहे.

मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून NCB कडून अनेक कारवाई सुरू आहेत. माहीम परिसरातील स्थानिक नागरिकांनी ड्रग्जची तस्करी होत असल्याची तक्रार NCB कडे केली होती. त्यानंतर NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली माहीम परिसरात पाळत ठेवून ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली. ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आल्यानंतर NCB चे समीर वानखेडे यांच्याकडून तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. दरम्यान या कारवाईनंतर माहीम परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीकडून पत्नीची निघृण हत्या