NCB DRUGS आर्यनसाठी सलमान खानची मन्नतवर धाव

मुंबईच्या समुद्रात शनिवारी झालेल्या रेव्ह पार्टीप्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह दोन जणांना एनसीबीने अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला उद्यापर्यंत एनसीबीची कोठडी दिली आहे. यामुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. थेट आर्यनच यात सापडल्याने शाहरुखची झोप उडाली असून त्याच्या मदतीला भाईजान म्हणजे दबंग सलमान खान धावल्याचे समोर आले आहे.

न्यायालयाने आर्यनला उद्यापर्यंत एनसीबीची कोठडी दिल्यानंतर सलमानने अडचणीत सापडलेल्या शाहरुखची मन्नत येथे जाऊन भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप समजले नसून सलमानने मन्नत बाहेरील फोटोग्राफर्सलाही फोटो काढण्यास मनाई केली. यामुळे एवढ्या रात्री दंबग खानने शाहरुखची भेट का घेतली असावी अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, उद्यापर्यंत आर्यनला एनसीबीची कोठडी मिळाल्यानंतर बॉलीवूडमध्येही तणावाचे वातावरण आहे. उद्या आर्यनसह अन्य आठ जणांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. एनसीबीच्या चौकशीत आर्यनने ड्रग्जचे सेवन केल्याची कबुली दिली होती. तसेच त्याच्या कॉन्टेक्ट लेन्सच्या डबीत ड्रग्ज आढळले आहेत. यामुळे त्याला हे ड्रग्ज कोणी दिले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.