घरताज्या घडामोडीCrusie Drug Case : शाहरूखच्या मॅनेजरवर NCB चे गंभीर आरोप, जामीन नाकारण्याची...

Crusie Drug Case : शाहरूखच्या मॅनेजरवर NCB चे गंभीर आरोप, जामीन नाकारण्याची विनंती

Subscribe

आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आज जामीन अर्जाला विरोध केला. सध्याच्या एनसीबीच्या तपासामध्ये छेडछाड करतानाच या प्रकरणातील तपासावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आर्यनला जामीन देण्यात येऊ नये असेही एनसीबीकडून सांगण्यात आले. एनसीबीचा पंच विटनेस असलेल्या प्रभाकर सईलने प्रतिज्ञापत्र हे कोर्टात दाखल न करता माध्यमांमध्ये वाटल्याचेही एनसीबीने म्हटले आहे. या संपुर्ण प्रकरणात शाहरूखची मॅनेजर पूजा दललानीने साक्षीदार प्रभाकर साईलवर प्रभाव टाकल्याचेही स्पष्टीकरण एनसीबीकडून कोर्टात मांडण्यात आले आहे.

या प्रतिज्ञापत्रातील अर्जदारावर पूजा ददलानीने प्रभाव टाकल्याचे एनसीबीने म्हटले आहे. त्यामुळेच या प्रकरणातील तपासावर प्रभाव पडतानाच सत्य शोधण्यासाठीचे प्रयत्न भरकटवण्याचा उद्देश असल्याचेही एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संपुर्ण प्रकरणात तपासादरम्यान पुरावे समोर आणले जातानाच संपुर्ण तपास कोलमडून टाकण्याचे प्रयत्न केले जात असल्याचेही एनसीबीने स्पष्ट केले आहे. त्यामुळेच एनडीपीएस कोर्टात याबाबतची माहिती सादर केली असल्याचेही एनसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याच आधारावर आर्यनचा जामीन फेटाळला जावा अशी मागणी एनसीबीने केली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात तपासादरम्यान काही गोष्टींशी छेडछाड झाली आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांवरही प्रभाव टाकण्यासाठीचा प्रयत्न झाल्याचे एनसीहीने म्हटले आहे. त्यामुळेच संपुर्ण तपासावर परिणाम होत आहे. म्हणूनच सदर प्रकरणी आर्यनचा जामीन म्हणूनच रद्द होणे गरजेचे असल्याचे एनसीबीने कोर्टात स्पष्ट केले. सईलने दाखल केलेल्या अहवालाच्या आधारावर एनसीबीकडून याचिका दाखल करण्यात आली होती. पण अशी कोणतीही ब्लॅंकेट ऑर्डर जाहीर करता येणार नसल्याचे स्पेशल कोर्टाकडून याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे.

आर्यन खानच्या वतीने या प्रकरणात बाजू मांडताना स्पष्ट करण्यात आले की समीर वानखेडे यांच्यावर होणारे आरोप आणि त्या आरोपांना देण्यात येणाऱ्या उत्तरांशी आर्यनचा कोणताही संबंध नाही. तसेच ठराविक राजकीय व्यक्तींशीही कोणताही संबंध नसल्याचे एनसीबीने स्पष्ट केले. तसेच प्रभाकर सईल किंवा त्याचा मालक असलेल्या किरण गोसावीही कोणताही संबंध नसल्याचे म्हटसले आहे. त्यामुळे इतर कोणीही या प्रकरणात केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणावर प्रभाव पडू नये असे आर्यनकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Cruise Drugs Case: किरण गोसावी सरेंडर झाल्यानंतर आणखीन मोठी माहिती पंच प्रभाकर साईल देणार

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -