NCBने ड्रग्ज खरेदी करताना टेलिव्हिजन अभिनेत्रीला पकडले रंगेहाथ!

attack on ncb squad in mumbai two officer injured
ड्रग्ज प्रकरण: NCBच्या पथकावर मुंबईत जमावाचा हल्ला, दोन अधिकारी जखमी

सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येच गूढ सोडवताना बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले. ज्यावर अजूनपर्यंत एनसीबी (NCB) काम करत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (Narcotics Control Bureau) अर्थात एनसीबीची टीम बॉलिवूडच्या कलाकारांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या गँग्सचा शोध घेत आहे. याच दरम्यान आता एनसीबीने मुंबईत एका ड्रग्ज सप्लायर गँगला पकडले आहे.

आज तक या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एनसीबीचे अधिकारी मुंबईतील वर्सोवा येथे दोन ठिकाणी साध्या कपड्यात गेले होते. ड्रग्ज सप्लायर गँगला संशय येऊ नये आणि ऑपरेशन पूर्ण व्हावे या हेतूमुळे अधिकारी साध्या कपड्यात गेले होते. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण देखील झाले. एनसीबीच्या टीमने पाच लोकांना अटक केली आहे. पण सध्या हे ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्रीला पकडले रंगेहात!

अशी माहिती समोर येत आहे की, या ऑपरेशन दरम्यान एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला रंगेहात पकडले आहे. ही अभिनेत्री त्यावेळेस ड्रग्ज पेडलरकडून ड्रग्ज खरेदी करत होती. आज या टेलिव्हिजन अभिनेत्रीला कोर्टात हजर केले जाईल. हे एक नवीन प्रकरण आहे आणि म्हणूनच त्यासाठी नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले होते. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणा दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यामध्ये अनेक बड्या कलाकरांची नावे समोर आली होती. एनसीबीकडून अभिनेत्री दीपिका पादूकोण, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग, सारा अली खान या अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती. तसेच सँडलवूडमध्ये काही दिग्गज कलकारांना देखील अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – भारतीय सैन्य कोणालाही आपल्या जमिनीवर कब्जा करू देणार नाही – राजनाथ सिंह