घरताज्या घडामोडीDrugs Case : NCB च्या दक्षता पथकाने आर्यन खानचा जबाब नोंदवला, आणखी...

Drugs Case : NCB च्या दक्षता पथकाने आर्यन खानचा जबाब नोंदवला, आणखी ७ जणांची चौकशी- ज्ञानेश्वर सिंह

Subscribe

या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीकडून एकूण १४ जणांची चौकशी

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी दिल्लीचे एनसीबी पथक तपास करत आहेत. आज एनसीबीच्या दक्षता पथकाकडून आर्यन खानचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. ड्रग्ज प्रकरणात आज दुसऱ्या चौकशीच्या वेळी आणखी ७ जणांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीकडून एकूण १४ जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दोन दिवस प्रभाकर साईलचा जबाब नोंदवण्यात आला असून गरज पडल्यास प्रभाकर साईलला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येईल,असे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

 

एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमने यावेळी काही महत्त्वाचे पुरावे हस्तगत केले आहेत. क्राईम सिनला भेट देऊन नाट्यरूपांतर करण्यात आले तसेच काही इलेक्ट्रॉनिक एव्हीडेन्सही ताब्यात घेतले आहेत. आणखी काही महत्वाच्या लोकांना यामध्ये सहभागी करुन त्यांची चौकशी करायची आहे त्यानंतर आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू असे ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

- Advertisement -

किरण गोसावीची चौकशी करण्यासाठी एनसीबीकडून कोर्टात अर्ज करण्यात आला असून सोमवारी त्यावर सुनावणी आहे.
प्रभाकर साईलची दोन दिवस सलग चौकशी करण्यात आली आणि गरज पडल्यास पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावलं जाईल,असे सिंह यांनी सांगितले. तपासात सहकार्य करण्यासाठी काही सीसीटीव्ही मिळावे यासाठी अशी विनंती मुंबई पोलिसांना केली होती त्यातील काही सीसीटीव्ही आम्हाला मिळालेले आहेत काही मिळायचे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्ञानदेव सिंह यांनी तपास कार्य वेगवान झाल्याचे सांगितले. आजप्रभाकर साईल याचा जबाब नोंदवून त्याची चौकशी करण्यात आली. आता के पी गोसावी याच्या जबाब होण्याची वाट पाहतोय. तो न्यायालयीन कोठडीत गेला की लगेचच आम्ही पुन्हा कोर्टात अर्ज करू आणि त्याची चौकशी करू असे ज्ञानदेव सिंह यांनी म्हटले.


हेही वाचा – Aryan khan drugs case आर्यन खानला अडकवण्याचा कट २७ सप्टेंबरलाच रचण्यात आला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -