पनवेलमध्ये मतदारांना पैसे वाटणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

निवडणूक भरारी पथक क्रमांक ५ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख महेंद्र गगलानी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रताप रामचंद्र आरेकर असे आहे.

NCP activist arrested in Panvel for distributing money
पनवेलमध्ये मतदारांना पैसे वाटणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक

पनवेलमधील सुकापूरमध्ये मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या एका कार्यकर्त्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक भरारी पथक क्रमांक ५ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख महेंद्र गगलानी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव प्रताप रामचंद्र आरेकर असे आहे.

प्रताप आरेकर हे विठ्ठल मंदिराजवळ, सुकापूर येथे राहतो. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३ मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या नावाच्या ७८ कोऱ्या आणि मतदारांच्या चिठ्ठ्या सापडल्या. त्याच्याकडे ५८०० रुपये रोख रक्कम असलेले २९ खाकी लिफाफे सापडले. प्रत्येक लिफाफ्यात २०० रुपयांच्या नोटा होत्या. याशिवाय त्याच्याकडे एक लाल रंगाची पिशवी होती आणि त्यात १७८ पानी रजिस्टर आणि त्यात साक्षी पार्क, जन्मोत्री, गोकुळधाम सोसायटी, श्रीनिकेतन, तपोवन, मातोश्री, साईकृपा, स्वर्णभूमी, सुंदरम सोसायटी अशी नावे व सदस्यांची नावे आढळली.

मतदारांना पैशाचे आमिष दाखविले या कारणासाठी खांदेश्वर पोलिसांनी भा. द.वि.सं कलम १७१ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. काल सायंकाळी कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांविरुध्द देखील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांनाही अटक करण्यात आली आहे.