राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मंगळवारीच पोटदुखीचा त्रास वाढल्याने ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्रीच त्यांच्यावर गॉलब्लॅडरची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पुर्ण करण्यात आली. सुप्रिया सुळे यांनीच शरद पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याबाबतची माहिती ट्विट करून दिली आहे. त्याचवेळी या शस्त्रक्रियेत सहभागी असणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचेही त्यांनी आभार मानले. शरद पवारांना पित्ताशयाच्या खड्यामुळे पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळेच नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधीच पवारांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय ब्रीच कॅंडीच्या डॉक्टरांच्या टीमने घेतला. त्याआधी तपासणीनंतर ३१ मार्च रोजी म्हणजे आज बुधवारी पवारांवर शस्त्रक्रिया नियोजित करण्यात आली होती. पवारांवर मंगळवारी शस्त्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्यांना येत्या चार दिवसात ब्रीच कॅंडीमधून डिस्चार्ज मिळेल अशी माहिती आहे. तर पवारांचे पित्ताशय काढून घेण्याचा निर्णय हा येत्या दोन आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे कळते. आता शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Thanking Dr.Maydeo, Dr. Golwala, Dr.Pradhan, Dr.Daftary, Dr. Samdani, Dr. Tibrewala and Breach Candy Hospital Team 🙏🏻 pic.twitter.com/SlUD8jh4by
— Supriya Sule (@supriya_sule) March 30, 2021
मंगळवारी रात्री ११ वाजताच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची अधिकृत माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पित्तनलिकेत स्टोन झाला होता. हा स्टोन शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला असून शरद पवारांना तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. शरद पवारांवर यांच्यावर ब्रीच कॅंडीत शस्त्रक्रिया कऱणाऱ्या टीममध्ये डॉ मायदेव, डॉ गोलावाला, डॉ दफ्तरी, डॉ समदानी, डॉ तिब्रेवाला या डॉक्टरांची टीम होती. तर कुटूंबीयांपैकी स्वतः सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि अजितदादा पवार हे ब्रीच कॅंडी येथे उपस्थित होते.
Sharad Pawar ji is doing well after the operation. Stone has been removed from the Gallbladder successfully: Maharashtra Health Minister Rajesh Tope (30.03) pic.twitter.com/5p68FrEB7p
— ANI (@ANI) March 30, 2021