घरताज्या घडामोडीमनात आणलं तर बाबासाहेबांचं स्मारक २ वर्षांत पूर्ण होईल - शरद पवार

मनात आणलं तर बाबासाहेबांचं स्मारक २ वर्षांत पूर्ण होईल – शरद पवार

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदू मिल कंपाऊंडला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक उभारणीच्या कामाची पाहणी केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिलला भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारक उभारणीच्या कामाची पाहाणी केली. मात्र, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्मारक उभारणीच्या कामाची जबाबदारी असणाऱ्या शापूरची-पालनजी कंपनीने मनावर घेऊन स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘स्मारकाचं २५ टक्के काम झालं आहे. पण ज्या कंपनीकडे हे काम आहे, ती या देशातली चांगली कंपनी आहे. त्यांनी जर मनापासून ठरवलं, तर हे काम २ वर्षांत करणं अशक्य नाही. पण त्यासाठी शापूरजी-पालनजी कंपनीने हे आव्हान म्हणून स्वीकारायला हवं’, असं ते म्हणाले.

‘वर्षातले २ दिवस काळजी घ्या!’

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी वर्षातल्या दोन दिवशी स्मारक ठिकाणी जास्त काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाला केलं आहे. ‘हे स्मारक भारतातीलच नाही तर जगभरातील लोकांसाठी महत्त्वाचं आकर्षण ठरेल. देशातला प्रत्येक नागरिक देशाला घटना देणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिल्याशिवाय जाणार नाही. हे स्मारक झाल्यानंतर तिथे येणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत मोठी वाढ होईल. विशेषत: ६ डिसेंबर आणि १४ एप्रिल या दोन दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता, त्या महिन्यांमध्ये विशेष काळजी घेणं गरजेचं आहे’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -