घरताज्या घडामोडीVideo: अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही जोरदार बॅटिंग

Video: अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही जोरदार बॅटिंग

Subscribe

राजकीय आखाड्यातील आक्रमक नेते अजित पवार हे त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जातात. मात्र, त्याच्या विरोधात अजित पवार हे सहसा पाहायला मिळत नाहीत. परंतु, पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरण येथे अजित पवार हे थेट राजकीय मैदानातून क्रिकेट च्या मैदानात उतरत फलंदाजी चा आनंद घेताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यांनी चौफेर फटके बाजी करत सर्वांची मने जिंकली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट सामान्य दरम्यान त्यांनी क्रिकेट चा आनंद घेतला आहे.

अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही 'दादागिरी'

अजित पवारांची क्रिकेटच्या मैदानातही 'दादागिरी'

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಡಿಸೆಂಬರ್ 15, 2019

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसरात्र क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. तेव्हा, शनिवारी दुपारी अजित पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थिती दर्शवली. त्यावेळी नगरसेवक राजू मिसाळ यांनी अजित पवार यांना फलंदाजी करण्याचा आग्रह केला. अजित पवार यांनीही होकार दर्शवत हातात बॅट घेतली. अजित पवार हे फलंदाजी करणार असल्याचे पाहून त्यांच्या अवतीभोवती गर्दी जमली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार यांना गोलंदाजी केली तर नगरसेवक राजू बनसोडे यांनी विकेट किपींग केली. अजित पवार यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्या चेंडूवर चांगलेच फटके लगावले. एरवी अजित पवार हे भाषणांच्या माध्यमातून विरोधातील व्यक्तीला क्लीनबोल्ड करताना अनेकांनी पाहिले असेलच. क्रिकेट आणि राजकारणी यांच्यात फारसा काही फरक नाही, दोन्हीमध्ये डावपेच हेच जमेची बाजू असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -