घरताज्या घडामोडीठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची लागण

ठाण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याला कोरोनाची लागण

Subscribe

ठाण्यात राष्ट्रवादीच्या एका नेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचाराकरता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पाच सुरक्षा रक्षक आणि आचारी कर्मचारी अशा १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली असतान ही घटना समोर आली आहे. सध्या आव्हाड हे होम क्वॉरंटाइन आहेत.

ठाण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. ठाण्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ८२ वर पोहचली आहे. तर ठाणे जिल्हयात हा आकडा अडीचशे पार केला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडत आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता एका कोरोनाबधित रूग्णांच्या संपर्कात आल्यानेच त्यांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर पदाधिकाऱ्यांची माहिती जमविण्याचे काम पालिका करीत आहे.

- Advertisement -

आव्हाडांच्या रिपोर्टवरून राष्ट्रवादीत दुमत

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, दुसरी चाचणी ही निगेटीव्ह आली आहे, असे धक्कादायक वक्तव्य पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मिलींद पाटील यांनी केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या एका नेत्याला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. आव्हाड यांची पहिली चाचणी ही निगेटीव्ह आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आव्हाडांच्या कोरोना रिपोर्टवरून ठाण्यात खळबळ उडाली आहे. पक्षातील दोन्ही पदाधिकाऱ्यांची परस्परविरोधी वक्तव्य केल्याने आव्हाड्यांना कोरोनाची लागण झाली होती कि नाही, असा प्रश्न उपस्थित हेात आहे. आव्हाड यांच्या ताफातील पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे.


हेही वाचा – ‘कोरोनामुळे राज्यावर आता दुसरं संकट येणार’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -