Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई कारागृहात पडल्यानं अनिल देशमुखांच्या खांद्यावर जे.जे. रुग्णालयात होणार शस्रक्रिया

कारागृहात पडल्यानं अनिल देशमुखांच्या खांद्यावर जे.जे. रुग्णालयात होणार शस्रक्रिया

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कारागृहात चालताना पडल्यानं अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार लागला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कारागृहात चालताना पडल्यानं अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार लागला आहे. त्यामुळं आता अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्रक्रिया केली जाणार आहे.

अनिल देशमुख यांना शनिवारी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते अस्थिव्यंग विभागात दाखल आहेत. आज त्यांचा एमआरआय येईल. त्यानंतर अधिकची माहिती समोर येईल अशी माहिती जे.जे. रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

अनिल देशमुख यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली मागील ६ महिन्यांपासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत. या सहा महिन्यांत अनिल देशमुख यांची प्रकृतीत बिघाड झाल्याचं दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर अनिल देशमुख यांचा जे.जे. रुग्णालयात दाखल करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

जे.जे. रुग्णालयातील लिफ्टच्या समोरच्या परिसरात हा व्हीडिओ चित्रीत करण्यात आला आहे. याठिकाणी अनिल देशमुख पोलिसांच्या गराड्यात व्हिलचेअरवर बसलेले दिसत आहेत. तुरुंगात असताना देशमुख यांचे पूर्ण रुप बदललेलं असून, त्यांच्या डोक्यावरचे सगळे केस पांढरे झालेले दिसत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांना २ एप्रिल रोजीच जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडले जाणार असल्याचं समजतं.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा आता सीबीआयला देण्यात आला आहे. मात्र देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यानं सीबीआय अधिकाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.


हेही वाचा – नवाब मलिकांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 18 एप्रिलपर्यंत वाढ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -