घरमुंबईजावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी यांनाही ED चं समन्स

जावई गिरीश चौधरींच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंची पत्नी मंदाकिनी यांनाही ED चं समन्स

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ईडीने आज गुरुवार ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. एकनाथ खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. तब्बल ९ तासाच्या चौकशीनंतर ईडी कार्यलायतून एकनाथ खडसे बाहेर पडले आहेत. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मात्र मंदाकिनी यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे वेळ वाढवून मागितली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना ईडीकडून चौकशीचे समन्स बजावण्यात आला त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. एकनाथ खडसेंच्या चौकशीच्या पूर्वी म्हणजेच ७ जुलै रोजी मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश होते. मात्र त्यांनी निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ मागितली आहे. परंतु ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

असे आहे प्रकरण

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी भूखंड एकनाथ खडसे यांनी खरेदी केला होता. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना भोसरी भूखंड हा पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली होती. सर्वे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा त्यांनी खरेदी केली. जमिनीची स्टॅम्प ड्युटी म्हणून १ कोटी ३७ लाख रुपयेही भरण्यात आले. सदर जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. व ती ९९ वर्षांच्या कराराव खरेदी करण्यात आली असल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन जमीन खरेदी केली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

खडसेंच्या जावयाला अटक

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सोमवारी ईडीने समन्स पाठवले होते. गिरीश चौधरी यांची उशीरा रात्रीपर्यंत चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. खडसेंच्या कन्येचीही ईडीने आज गुरुवार ८ जुलैला केली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -