घरमुंबईJitendra Awhad : 'महानंद आता गुजरातला विकलेय ! जय हो महानंद'

Jitendra Awhad : ‘महानंद आता गुजरातला विकलेय ! जय हो महानंद’

Subscribe

मुंबई : महानंद डेअरीचे संचालक राजेश पराजणेंसह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी दूध महासंघ व्यवस्थापकीय संचालकांकडे पराजणेंचा राजीनामा पाठवण्यात आला आहे. याच मुद्यावरून आता राजकारण तापलं आहे. विरोधकांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. दरम्यान, महानंद आता एनडीडीबीकडे जाणार असल्याने शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर एक्सवर पोस्ट करुन टीका केली आहे.

काय म्हणतात जितेंद्र आव्हाड ?

मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय !
जय हो, महानंद की !

- Advertisement -

आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर

राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे आरोप होत असतानाच आता आणखी एक मोठा प्रकल्प राज्याबाहेर जाणार असल्याने विरोधक संतप्त झाले आहेत. महानंद डेअरी प्रकल्प आता गुजरातला जाणार असल्याच्या मुद्यावरून वातावरण तापलं असून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महानंद आता एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महानंद डेअरीचा संपूर्ण कारभार आता गुजरातमधून चालवला जाणार आहे. याच मुद्यावरून विरोधक संतापले असून सरकारला एक डेअरी चालवता येत नाही का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते, जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Resident Doctor : आश्वासन देऊनही मागण्या अपूर्णच, राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर

उद्या मुंबई देखील न्याल…

शिवसेना उद्धव गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील उद्योग आता गुजरातकडे वळवले जात आहेत. आज उद्योग जात आहेत, उद्या मुंबईही गुजरातमध्ये नेली जाईल. हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा डाव आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

हेही वाचा – Farmer’s Protest : आरएसएस म्हणते, शेतकऱ्यांचे आंदोलन ‘राजकीयदृष्ट्या प्रेरित’!

माहिती न घेता आरोप करतात

दरम्यान, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महानंदच्या हस्तांतरणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महानंद हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक होणार आहे. याआधीच्या लोकांच्या गलथान कारभारामुळे कामगारांचा प्रलंबित राहिलेला पगार देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 500 कामगारांना व्हीआरएस देण्याच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होईल. जळगाव दूध संघ देखील हस्तांतरित करण्यात आला होता तो आता नफ्यात आल्यावर परत मिळाला आहे. गुजरातला प्रकल्प देत असल्याची आमच्यावर टीका होते आहे, पण काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. माहिती न घेता आरोप करण्याची पद्धत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -