घरताज्या घडामोडीआजोबांपाठोपाठ नातूचीही 'एमसीए'मध्ये एन्ट्री; रोहित पवारांची सदस्य म्हणून निवड

आजोबांपाठोपाठ नातूचीही ‘एमसीए’मध्ये एन्ट्री; रोहित पवारांची सदस्य म्हणून निवड

Subscribe

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ त्यांचा नातू आमदार रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे. रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ त्यांचा नातू आमदार रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे. रोहित पवार यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे रोहित पवार हे असोशिएशनचे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ncp Mla Rohit Pawar Elected As Member Of MaharashtraCricket Association Body)

महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा क्लब गटाकडून विजय झाला. असोशिएशनच्या कमिटीची बैठक आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सुरू आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या १६ सदस्याच्या कमिटीमध्ये रोहित पवारांची निवड झाली आहे.

- Advertisement -

शरद पवार यांनीसुद्धा मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. तर भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी या निवडणुकीसाठी त्यांनी युती केली होती.

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत अमोल काळे यांनी बाजी मारत अध्यक्षपद मिळवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे काळे यांनी चुरशीच्या लढतीत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा २५ मतांनी पराभव केला. मुख्य पदाधिकाऱ्यांच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार- भाजपा नेते आशिष शेलार गटाचे उमेदवार जिंकून आले. तसेच अपेक्स काऊन्सिल कमिटीच्या ९ पैकी ६ जागा जिंकत पवार-शेलार गटाने एमसीए निवडणुकीत एकहाती वर्चस्व राखले.

- Advertisement -

अमोल काळे यांनी एकूण १८३ मते मिळवली, तर पाटील यांना १५८ मतांवर समाधान मानावे लागले. सचिवपदासाठी अजिंक्य नाईक यांनी निर्विवाद वर्चस्व राखत सर्वाधिक २८६ मते मिळवली. विशेष म्हणजेयाआधी इतकी मते कोणत्याही पदासाठी मिळाली नव्हती. सचिवपदासाठी नाईक यांनी मयांक खांडवाला (३५) आणि नील सावंत (२०) यांचा एकतर्फी पराभव केला. खजिनदार पदासाठी अत्यंत अटीतटीची लढत रंगली.


हेही वाचा – दिल्ली अपघात : माहिती असूनही अंजलीला गाडीखालून फरफटत नेले, चौकशीतून बाब समोर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -