घरमुंबईराष्ट्रवादीचा मुंबई विद्यापिठाला 'टाळे लावा' आंदोलनाचा इशारा

राष्ट्रवादीचा मुंबई विद्यापिठाला ‘टाळे लावा’ आंदोलनाचा इशारा

Subscribe

मुंबई विद्यापीठाने ३५ हजार विद्यार्थ्यांना चुकून अनुत्तीर्ण केल्याची घटना नुकतीच घडली आहे. दरवर्षी सातत्याने असे प्रकार होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास उडाला आहे. गेल्या वर्षी ९७ हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. त्यापैकी ३५ हजार म्हणजेच तब्बल ३६ टक्के विद्यार्थ्यांना चुकून अनुत्तीर्ण करण्याचा प्रताप विद्यापीठाने केला आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षाचा निकाल आल्यानंतर सुमारे ९७ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला होता. हा आकडा विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा आहे. तसेच हा आकडा विद्यार्थ्यांचा विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास कमी झाल्याचंही दर्शवतो. २०१४ ते २०१६ या तीन वर्षांत विद्यापीठाच्या परीक्षेत सुमारे ७३ हजार विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका चुकीच्या पद्धतीने तपासल्या होत्या.यावरुन मूल्यांकनाच्या गुणवत्तेवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत. असे मत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड.अमोल मातेले यांनी मांडले आहे.

विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यांकन प्रक्रियेवरुन विश्वास उडाला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ परिक्षा भवनाची न्यायालयीन चौकशी झाली पहिजे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संशय निर्माण होऊन सबंध विद्यार्थी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. याची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. विद्यार्थीना ऑन लाईन निकाल लागून पदवीच्या प्रमाणपत्र आजून पर्यंत मिळाली नाही. असे अनेक विद्यार्थी संबधित कॉलेज आणि परिक्षा भवनामध्ये दररोज फेऱ्या मारून पदवी प्रमाणपत्र मिळाली नाही. ही परीक्षा भवनाची शोकांतिका आहे. परीक्षा भवनाचा कारभार सुधारला नाहीतर परीक्षा भवनाला “टाळेलावा” आंदोलन करावे लागेल. असा इशारा अमोल मातेले यांनी दिला आहे.

- Advertisement -

२०१७ साली दुसऱ्या सत्रातही जवळपास ४७ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी ७६ हजार ८६ उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी पाठवल्या होत्या. त्यामध्ये १८ हजार २५४ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासताना विद्यापीठाकडनून चुक झाल्याचे आढळले होते.

२०१६ साली प्रथम पहिल्या सहामाही परीक्षेत पहिल्या सत्रातही ४४ हजार ४४१ विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली होती. त्यापैकी १६ हजार ९३४ विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनानंतर उत्तीर्ण करण्यात आले होते. २०१४ मध्येही जवळपास ८० हजार विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. ती संख्या यंदा लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

- Advertisement -

हे वाचा – मुंबई विद्यापीठाने ३५ हजार पास विद्यार्थ्यांना केले नापास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -