घरमुंबईराष्ट्रावादीचा ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वाधिक जागांवर विजय - जयंत पाटील

राष्ट्रावादीचा ग्रामपंचायत निवडणूकीत सर्वाधिक जागांवर विजय – जयंत पाटील

Subscribe

भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही

राज्यात १३ हजार २९५ ग्रामपंचायतीच्या निवडणूका शुक्रवार १५ जानेवारीला पार पडल्या होत्या. ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल सोमवारी १८ जानेवारीला जाहीर झाला आहे. या निकालानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्याला जास्ता जागा मिळवल्याचा दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर भाजपाला महाराष्ट्रात २० टक्केही जागा मिळवता आले नसल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात १३ हजार २९५ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये ३ हजार २७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी विजयी झाली आहे. तर काँग्रेस – १९३८, भाजप – २९४२,शिवसेना – २४०६ यांनी एवढया ग्रामपंचायती घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळातील पक्ष असल्याचे आज सिद्ध झाले आहे. वेगवेगळया जिल्हयात वेगवेगळे पक्ष पुढे आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांचा दावा आहे. मात्र महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजप महाराष्ट्रात २० टक्केही नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपाने २०१३ जागांवर विजय मिळवला असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पेढे वाटून आनंदही साजरा केला होता. तसेच राज्यातील जनतेला भाजपाला पसंती दिल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -