घरमुंबईढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो...,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिंदे - फडणवीस सरकार विरोधात...

ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो…,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिंदे – फडणवीस सरकार विरोधात आंदोलन

Subscribe

मुंबई  – महाराष्ट्रात नियोजित असणारा वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनीचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. यानंतर महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार परराज्यात नेणार्‍या शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आंदोलन केले. कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन येथे हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी ढोकळा न फाफडो,वेदांत प्रोजेक्ट आपडो… पन्नास खोके मजेत बोके, महाराष्ट्राला धोके… शिंदे – फडणवीस तुपाशी, महाराष्ट्र उपाशी… गुजरातच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले महाराष्ट्रद्रोही नेते… स्वतःला ५० खोके, महाराष्ट्रातल्या युवकांना धोके… ईडी सरकार हाय हाय… अशा घोषणांनी राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून गेला.

- Advertisement -

युवक काँग्रेसच्यावतीने मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी राष्ट्रवादी भवन येथेच युवकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आणि कार्यकर्त्यांनी शिंदे – फडणवीस यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. यावेळी युवकांनी फलक दाखवून आणि घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -