घरताज्या घडामोडीकूपरेज बँडस्टँडवर एनसीपीए ऍट दी पार्क संगीत व कला महोत्सवाला प्रारंभ

कूपरेज बँडस्टँडवर एनसीपीए ऍट दी पार्क संगीत व कला महोत्सवाला प्रारंभ

Subscribe

११ मार्च रोजी वसंत उत्सवात लावणी, टागोर नृत्य आणि कथ्थक अशा भारतातल्या विभिन्न नृत्यप्रकारांनी वसंत ऋतूचं आगमन साजरं केलं जाईल.

NCPA at the Park Music and Arts Festival : दक्षिण मुंबईत स्थित कूपरेज बँडस्टँड उद्यान येथे राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्) यांच्यावतीने आज ४ मार्च  पासून ‘एनसीपीए ऍट दी पार्क’ हा संगीत व कला महोत्सव सुरू झाला आहे. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात आज ‘सिंफनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया’चे कलाकारांनी वॉल्झ, मार्चेस, पोल्फा यासारख्या संगीत प्रकारांचे सादरीकरण केले.

- Advertisement -

उद्या,५ मार्च रोजी सायंकाळी ‘अनइरेझ पोएट्री’ हा भारतातील सर्वात मोठा बोलभाषा गट अनोख्या काव्यात्मक छंदांत गुंफून गद्य कथा सादर करणार आहेत.

११ मार्च रोजी वसंत उत्सवात लावणी, टागोर नृत्य आणि कथ्थक अशा भारतातल्या विभिन्न नृत्यप्रकारांनी वसंत ऋतूचं आगमन साजरं केलं जाईल. तर १२ मार्च  रोजी कोमल कुवाडेकर आणि जॅझ बँड यांच्यावतीने जॅझ, सोल, फंक व आर ऍण्ड बी सारख्या भावपूर्ण संगीत प्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रथम येणा-यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर विनामूल्य प्रवेश दिला जातो आहे. कोविड प्रतिबंधक सर्व निर्देशांचे पालन करुन हा उपक्रम राबविला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट! २४ तासांत ७८ नव्या रुग्णांची वाढ, तर एकही मृत्यूची नोंद नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -