घरमुंबईजाणत्या राजाच्या मध्यस्थीने दोन राजेंमधील वाद मिटले

जाणत्या राजाच्या मध्यस्थीने दोन राजेंमधील वाद मिटले

Subscribe

शरद पवार यांनी साताऱ्याच्या दोन्ही राजेंचे मनोमिलन केले. आमच्यात थोडीफार नाराजी होती ती दूर झाली असून, सगळे एकत्र काम करू असे दोन्ही राजेंनी यावेळी सांगितले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. मात्र आता या दोन राजेंमधील वाद संपुष्टात आणण्यात जाणत्या राजाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यश आले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली असून, या बैठकीसाठी खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे देखील उपस्थित होते. मात्र, ही बैठक संपल्यानंतर आमच्यात आमच्यात फार वाद नव्हते असे खासदार उदयनराजे यांनी सांगितले. तसेच जी काही थोडीफार नाराजी होती ती दूर झाली असून, सगळे एकत्र काम करू असे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले. तर, आमदार शिवेंद्रराजे यांनी देखील शरद पवार यांच्या पुढे आम्ही कोणी नसल्याचे सांगत वादावर पडदा टाकला.

नेमकं काय म्हणाले दोन्ही राजे 

आमच्यात फार वाद नव्हता. जे वाद होते ते थोडे फार राहणारचं पण शरद पवार यांना शिवेंद्रराजे भेटले नव्हते तर ते कार्यकर्ते भेटले होते. तसेच जे काही गैरसमज झाले होते त्याला शिवेंद्रराजे किंवा मी जबाबदार नाही, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. एवढेच नाही तर आता जस त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांना समजवावे लागेल तसे मला ही माझ्या कार्यकर्त्याना समजवावे लागेल असे देखील राजे म्हणालेत. तर शरद पवार यांच्या पुढे आम्ही कोणी नाही, असे सांगत मला माझ्या कार्यकर्त्यांना समजवावा लागेल. माझ्या निवडणुकीला वेळ आहे. त्यामुळे आम्ही एकत्र काम करायचं असं ठरवलेल असल्याची प्रतिक्रिया शिवेंद्रराजे यांनी दिली.

- Advertisement -

हे वाचा – ‘प्रत्येकाने लघवी साठवल्यास देशाचे ४० हजार कोटी वाचतील’ – नितीन गडकरी

राजेंची कॉलर पवारांनी खाली केली

दरम्यान, शरद पवार यांनी मी साताऱ्यात गेलो की, सगळ्यांच्या कॉलर खाली राहतात असे सूचक वक्तव्य केले होते. त्यानुसार आज एकमेकांसमोर कॉलर उडवणाऱ्या राजेंची कॉलर आज पवारांनी मनोमिलन करत खाली केली, असे समजायला हरकत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यातील या दोन राजेंमध्ये काही दिवसांपूर्वी मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच नाही, असं म्हणत शिवेंद्रराजेंनी आपण अजूनही उदयनराजेंवर नाराज असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा या राजेंमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी जाणत्या राजाला पुढाकार घ्यावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -