घरमुंबईNeelam Gorhe : महामार्गासह, तीर्थक्षेत्र परिसरातील स्वच्छतागृहे सुस्थितीत ठेवा; नीलम गोऱ्हेंचे आदेश

Neelam Gorhe : महामार्गासह, तीर्थक्षेत्र परिसरातील स्वच्छतागृहे सुस्थितीत ठेवा; नीलम गोऱ्हेंचे आदेश

Subscribe

महिलांसाठीची स्वच्छतागृहे सुस्थितीत राहतील. त्यामध्ये पुरेसे पाणी, सॅनिटरी पॅडसाठी मशीन, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कचरा पेटी, हात धुण्यासाठी साबण व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत खबरदारी घेतली जावी. अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्या.

मुंबई : राज्यातील सर्व महामार्गवरील, पेट्रोल पंपवरील आणि तीर्थक्षेत्रामधील सार्वजनिक स्वच्छतागृह ही अस्वच्छ व दुर्लक्षित आहेत. ती फार तुटपुंजी व अनेक ठिकाणी शौचालयात आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधा ही नाहीत. त्यामुळे प्रवाशांना, भाविकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सध्याची अस्तित्वातील सर्व स्वच्छतागृहे ही सुस्थितीत ठेवावीत. तसेच ज्या ठिकाणी स्वच्छ्ता गृहे नाहीत त्या ठिकाणी अद्ययावत अशी स्वच्छतागृहे उभारली जावीत. असे आदेश विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले. (Neelam Gorhe Maintain toilets in shrine areas including highways Order of Neelam Gohre)

महिलांसाठीची स्वच्छतागृहे सुस्थितीत राहतील. त्यामध्ये पुरेसे पाणी, सॅनिटरी पॅडसाठी मशीन, ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कचरा पेटी, हात धुण्यासाठी साबण व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत खबरदारी घेतली जावी. अशा सूचना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्या.

- Advertisement -

त्यापुढे म्हणाल्या की, राज्यभर पेट्रोल पंपावर स्वच्छता गृहांची तपासणी विशेष मोहीमेद्वारे करावी. अस्वच्छ व दुर्लक्षित स्वच्छता गृहे तत्काळ दुरुस्त करून घ्यावीत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वच्छता गृहे उपलब्ध बाबत ॲप तयार करावे. या ॲपमार्फत उपलब्ध स्वच्छतागृहांची माहिती लोकांना मिळेल. तसेच या स्वच्छता गृहांचे मानांकन करून ॲपवर घ्यावे. त्यामुळे चांगल्या स्वच्छता गृहंची माहिती लोकांना या ॲपमध्ये उपलब्ध होईल. तसेच आळंदीसह राज्यातील सर्वच तीर्थक्षेत्रे, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी ही आवश्यक त्या ठिकाणी चांगली व आधुनिक व सर्व सोयीनियुक्त अशी स्वच्छता गृहे बांधावीत असेही डॉ सांगितले.

हेही वाचा : Loksabha Election 2024 : जरांगे पाटलांसाठी ‘वंचित’चा प्रस्ताव; जालन्यातून उमेदवारी देण्याची तयारी

- Advertisement -

आज विधानभवनातील सभापती यांच्या दालनात यासंदर्भात बैठक झाली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिल्या. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, याविषयासंदर्भात हमसफर संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याचसोबत प्रत्येक हॅाटेल व रिसॉर्टमधील स्वच्छतागृहे सर्वांना व महिलां प्रवाशांना कायद्याने खुली केली आहेत. परंतु त्याची माहिती सर्वदूर पोचविण्यात येईल अशी ग्वाही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. उपसभापती यांनी केलेल्या सूचनांनुसार लवकरच त्या अनुषंगाने तत्काळ उपाययोजना करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल असेही चव्हाणांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -