घरमुंबईनेरूळ- खारकोपर लोकल सुस्साट

नेरूळ- खारकोपर लोकल सुस्साट

Subscribe

तीन दिवसांत ५७ हजार प्रवाशांनी केला प्रवास

सिडकोच्या नेरूळ-उरण या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गापैकी पहिल्या टप्प्यात नेरूळ-खारकोपर हा रेल्वेमार्ग सोमवारपासून सुरू झाला. या लोकल सेवेला मागील तीन दिवसांपासून प्रवाशांनी बराच प्रतिसाद दिला. मागील तीन दिवसांत बामनडोंगरी आणि खारकोपर स्थानकातून १२ हजार ७२० तिकीट विक्री झाली असून या माध्यमातून एकूण ५७ हजार ७६९ इतक्या प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे नेरुळ-खारकोपर रेल्वेसेवा फायदेशीर ठरत आहे.

नेरूळ-खारकोपर या रेल्वेमार्गाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारपासून नियमितपणे नेरूळ ते खारकोपर मार्गावर २० आणि बेलापूर ते खारकोपर मार्गावर २० फेर्‍या चालविण्यात येत आहेत. यात बामनडोंगरी आणि खारकोपर स्थानकातून मागील तीन दिवसांत ५७ हजार ७६९ इतक्या प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

- Advertisement -

मागील तीन दिवसांत बामनडोंगरी स्थानकातून ८,९८४ इतकी तिकिटांची विक्री झाली असून ४३ हजार ४१ प्रवाशांनी प्रवास केला. यामधून जवळपास ५ लाख ५० हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले. तर मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २,७५० तिकिटांची विक्री झाली, तसेच १८ हजार प्रवाशांनी बामनडोंगरीतून प्रवास केला. तर खारकोपर रेल्वे स्थानकातून मागील तीन दिवसांत ३,८३६ इतकी तिकीट विक्री झाली. त्याच्या माध्यमातून १४ हजार ७२८ प्रवाशांनी खारकोपरवरून प्रवास केला. त्यामुळे या तीन दिवसांत बामनडोंगरी आणि खारकोपर स्थानकातून १२ हजार ७२० तिकीट विक्री झाली असून या माध्यमातून एकूण ५७ हजार ७६९ इतक्या प्रवाशांनी प्रवास केला.

प्रवाशांना दिलासा
नेरूळ-खारकोपर रेल्वेमार्ग सुरू होत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये व दररोज या मार्गावर प्रवास करणार्‍या नोकरदारांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत आहे. नेरूळ ते उलवे असा दररोज बस व रिक्षाने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी या रेल्वेसेवेमुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रोज बस व रिक्षाने नेरूळ ते उलवा प्रवास करताना जादा पैसे मोजावे लागत होते. तसेच, प्रवास करताना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत होते. मात्र सोमवारपासून नियमितपणे नेरूळ ते खारकोपर मार्गावर लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

बामनडोंगरी खारकोपर
————————————————————————-
तिकीट / प्रवासी तिकीट / प्रवासी
सोमवार ३५१५- १९६०१ १५३७-७६९४
मंगळवार २७५०-१८००० ११००-३६००
बुधवार २७१९- ५४४० १०९९-३४३४
———————————————————————-
एकूण ८९८४- ४३०४१ ३८३६- १४७२८
——————————————————————–

नेरूळ ते खारकोपर मार्गावर लोकलसेवा सोमावरपासून सुरु करण्यात आली आहे. आज लोकलसेवेचा चौथा दिवस होता. या लोकलसेवेमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसे यांची बचत होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सोय झाली आहे. इतक्या लवकर या मार्गाचे मूल्यांकन करणे बरोबर नाही.
– ए.के. जैन, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -