घरCORONA UPDATEVaccination for 15-18 age group: १५ ते १८ वर्षीय मुलांच्या लसीकरणासाठी सोमवारपासून...

Vaccination for 15-18 age group: १५ ते १८ वर्षीय मुलांच्या लसीकरणासाठी सोमवारपासून २०० लसीकरण केंद्र

Subscribe

सध्या ९ लसीकरण केंद्रांवर या मुलांसाठी लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ५८ हजार ६७८ मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र ९ लाखांपेक्षाही जास्त मुलांचे नियोजित लक्ष्य २८ दिवसांत गाठण्यासाठी व लसीकरणाला गती देण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा आणखीन २०० लसीकरण केंद्र नव्याने सुरू करणार आहे.

मुंबईतील १५ ते १८ वयोगटातील (Vaccination for 15-18 age group)  ९ लाखांपेक्षाही जास्त संख्या असलेल्या मुलांचे कोविड, ओमिक्रॉन (Omicron ) विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने मुंबई महापालिकेने ३ जानेवारीपासून लसीकरण सुरू केले आहे. सध्या ९ लसीकरण केंद्रांवर या मुलांसाठी लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत ५८ हजार ६७८ मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र ९ लाखांपेक्षाही जास्त मुलांचे नियोजित लक्ष्य २८ दिवसांत गाठण्यासाठी व लसीकरणाला गती देण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा आणखीन २०० लसीकरण केंद्र नव्याने सुरू करणार आहे. त्यामुळे या १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविडच्या संसर्गापासून मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, राज्य सरकार व मुंबई महापालिकेचे टेन्शन कमी होण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारने कोविड -१९ पासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीमेचा शुभारंभ झाला. अगोदर कोविडचा मुकाबला करणाऱ्या हेल्थकेअर वर्कस, फ्रंट लाईन वर्कस यांना लसीचे डोस देण्यात आले. मात्र आता १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीचे डोस देण्याची मागणी वारंवार झाल्याने केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने मुंबईत ३ जानेवारी २०२२ पासून ९ लसीकरण केंद्रांवर सदर मुलांना लसीचे डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

१५ ते १८ वयोगटातील तब्बल ९ लाख २२ हजार ५१६ मुलांना फक्त ९ लसीकरण केंद्रांद्वारे लसीचे डोस देणे शक्य नव्हते. त्यामुळे आता पालिकेने आणखीन २०० नवीन लसीकरण केंद्र येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा व लसीकरण लक्ष्य गाठण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार; ६ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -