घरताज्या घडामोडीराज्यात 697 नवे कोरोना रुग्ण; 2 बाधितांचा मृत्यू

राज्यात 697 नवे कोरोना रुग्ण; 2 बाधितांचा मृत्यू

Subscribe

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. अशातच राज्यात 697 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. अशातच राज्यात 697 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत चढ-उतार होत आहे. गुरूवारी राज्यात 755 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोना रूग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त आहे. (New 697 corona patients in maharashtra 2 death)

राज्यात शुक्रवारी 984 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, आजपर्यंत 79 लाख 61 हजार 282 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के एवढे झाले आहे. तसेच, राज्यात 2 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे. गुरूवारी 4 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला होता.

- Advertisement -

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 4 हजार 723 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. मुंबईत सध्या 1 हजार 217 सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यात 1 हजार 145 सक्रिय रूग्ण आहेत. ठाण्यात सध्या 880 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 298 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या सध्या 46 हजारांच्या पुढे पोहोचली आहे. 23 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशात एकूण पाच लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोना विषाणूमुळे प्राण गमावले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – दसऱ्याला शिवाजी पार्क सुने-सुने; कायदा सुव्यवस्थेमुळे दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -